आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indigo Airlines Announces 1499 Offer To Take On Spicejet Valentine Offer News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'इंडिगो\'चे स्वस्त तिकिटाच्या स्पर्धेत उड्डाण; \'स्पाइसजेट\'पाठोपाठ दिली आकर्षक ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'स्पाइसजेट'ने 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त प्रवाशांसाठी 'व्हॅलेंटाइन ऑफर' दिली आहे. सर्व करांसहित 1599 रुपयांत 'स्पाइसजेट'ने प्रवाशांना हवाई सफर करण्याची संधी दिली आहे. 'स्पाईसजेट' पेक्षा तिकिटदरात शंभर रुपये कमी करून 'इंडिगो' एअरलाइन्सने स्पर्धेत उडी घेतली आहे. 'इंडिगो' एअरलाइन्सने एक पाऊल पुढे जाऊन 1499 रुपयांत हवाई सफर करण्याची आकर्षक ऑफर दिली आहे.

'इंडिगो'च्या ऑफरनुसार, ऑफरमधील तिकिट 90 दिवस अगोदर बुक करावे लागेल. तसेच ऑफरमधील तिकिटावर निर्धारित रुटवरच प्रवास लागू राहील.

दरम्यान, 'स्पाइसजेट'च्या 'व्हॅलेंटाइन ऑफर'नुसार, प्रवाशांना 4 ते 6 फेब्रुवारी या दोन दिवसांत तिकिट बुक करता येईल. तसेच 14 फेब्रुवारी ते 15 एप्रिल या एक महिन्याच्या काळात प्रवासाचा लाभ घेता येईल. ही ऑफर आंतर्देशीय उड्डानांवर लागू असेल.तसेच देशातील सर्व रूटवर प्रवाशांना या ऑफरचा लाभ घेता येईल, अशी माहिती स्पाइसजेटच्या सूत्रांन‍ी दिली आहे.