मुंबई - खासगी क्षेत्रातील इंडस इंड बॅँकेने कृषी क्षेत्राच्या वाढत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ‘ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणे’ असा खास नवा वित्त विभाग सुरू केला आहे.
नवीन विभाग सुरू करतानाच ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी विनाकटकट कागदपत्रांसाठी वेळेवर रक्कम अदा करणे, पीकपद्धतीनुसार शेती व व्यवसाय वापरासाठी सुलभ पर्याय अशा विविध योजनादेखील बॅँकेने जाहीर केल्या आहेत. कमी वेळेत कर्जासाठी शेतकर्यांची वैयक्तिक भेट घेणार आहेत.