आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - महाराष्ट्रा त उद्योगांना 24 तास वीज मिळते. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत येथील उद्योगांची स्थिती उत्तम असल्याचा निष्कर्ष फिक्की व ब्रिफ या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात मांडण्यात आला आहे. महाराष्ट्रा तील उद्योगांना विजेची उपलब्धता पहिल्यापासूनच चांगल्या प्रकारची आहे. पूर्वी उद्योगांना आठवडी सुटी वगळता कुठलीही वीज कपात लागू नव्हती. 14 फेब्रुवारी 2012 नंतर ही आठवडी सुटी रद्द करण्यात आली असून महाराष्ट्रा त उद्योगांना 24 तास वीज उपलब्ध करून दिली जाते. या कामगिरीची नोंद देश पातळीवर घेण्यात आली असून त्याचा परिणाम फिक्कीच्या निष्कर्षात दिसून आला आहे. मागील तीन महिन्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 20 राज्यातील 650 पेक्षा अधिक उद्योगांकडून वीज स्थितीबाबतची माहिती घेण्यात आली. त्यात देशातील 32 टक्के उद्योगांना 10 तासांपर्यंत, तर 61 टक्के उद्योगांना 10 तासांपेक्षा अधिक वीज उपलब्ध नसते, असे आढळून आले आहे. देशातील केवळ महाराष्ट्र , कर्नाटक आणि गुजरात या राज्यांतील उद्योगांना पुरेशी वीज मिळत असून इतरत्र वाईट परिस्थिती असल्याचा निष्कर्ष आहे. उद्योगांना नियमित वीज मिळावी यासाठी 10 कलमी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
‘फिक्की’ने सुचवले उपाय
* भारनियमन निगडित माहितीचा प्रसार.
* वीज चोरांना दंड तसेच कडक कायदा.
* वीज निर्मितीसाठी पर्यायी स्रोतांचा वापर करण्यास प्रोत्साहन.
* ग्रीन बिल्डिंगला सवलती.
* स्मार्ट ग्रीडची अंमलबजावणी.
* संरक्षण प्रणालीचा व्यापक आढावा आणि लेखा परीक्षण.
*लोड डिस्पॅच सेंटरशी सुसंवाद साधणे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.