आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industrial Cycle Speedy, But Two Decade Bad Record

औद्योगिक चक्राला गती, मात्र दोन दशकांचा नीचांक कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निर्मिती क्षेत्राने केलेल्या लक्षणीय कामगिरीमुळे औद्योगिक चक्राला अखेर गती मिळाली आहे. ऊर्जा, भांडवली वस्तू आणि बिगर ग्राहकोपयोगी क्षेत्रांच्या उत्पादनात चांगली वाढ झाल्यामुळे मार्च महिन्यात ओद्योगिक उत्पादनात 2.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत औद्योगिक उत्पादन 2.8 टक्क्यांनी घटले होते. मार्च महिन्यात झालेल्या या सुधारणेमुळे चालू वर्षात विकासदर 6 टक्क्यांवर जाण्याच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.


मार्च महिन्यात चांगली कामगिरी झालेली असली तरी 2012 - 13 या वर्षात मात्र औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची वाढ केवळ एक टक्का नोंद झाली असून मागील वर्षातल्या 2.9 टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे. परंतु गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात 0.5 टक्क्यांची घट झाल्यानंतर सलग तिसºया महिन्यात औद्योगिक उत्पादनाची कामगिरी सकारात्मक पातळीवर आहे.


औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 75 टक्के वाटा असलेल्या निर्मिती क्षेत्राने गेल्या वर्षातल्या मार्च महिन्यातील 3.6 टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात 3.2 टक्क्यांची वाढ साध्य केली आहे. त्याचप्रमाणे प्रमुख पायाभूत क्षेत्रांनी 2011 - 12 मधील 3.2 टक्के वाढीच्या तुलनेत 2012-13 वर्षात 1.2 टक्के इतकी कमी वाढ नोंदवली आहे.


उद्योजगत मात्र सावध : औद्योगिक उत्पादनात वाढ झालेली असली तरी संपूर्ण उद्योग क्षेत्राचा धोका अद्याप टळलेला नाही. गुंतवणुकीला चालना देणे आणि व्याज दरकपातीच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले आहे.


सरकारला दिलासा
जानेवारीपासून चढत्या भाजणीचा कल दाखवण्यास सुरुवात केलेल्या औद्योगिक उत्पादनाच्या मार्च महिन्यातील कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना आर्थिक व्यवहार सचिव अरविंद मायाराम म्हणाले की, नेमका हाच कल आम्हाला अपेक्षित होता. महागाईत झालेली घट आणि गतिमान होऊ लागलेले औद्योगिक चक्र लक्षात घेता चालू आर्थिक वर्षात विकासदर 6 टक्क्यांच्या वर जाईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.