आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक उत्पादन घसरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात घट झाली. जुलैमध्ये 2.8 टक्के अशी विक्रमी वाढ नोंदवणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) ऑगस्टमध्ये 0.6 टक्क्यांपर्यंत घसरला. ही घसरण अत्यंत निराशाजनक असल्याचे मत व्यक्त करून कंपन्यांनी व्याज दरात कपात करण्याची मागणी केली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आयआयपीत 2 दोन टक्के वाढ झाली होती. या निर्देशांकात 75 टक्के वाटा असणार्‍या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने नकारात्मक कामगिरी करत 0.1 टक्का वाढ नोंदवली. गेल्या वर्षी या क्षेत्राने 2.4 टक्के वाढ नोंदवली होती.