नवी दिल्ली - ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंच्या मागणीतील घट आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची खराब कामगिरी यामुळे ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादनाला फटका बसला आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) म्हणून ओळखले जाणारे हे उत्पादन ऑगस्टमध्ये ०.४ टक्क्यावर आले आहे. ही मागील पाच महिन्यांची नीचांकी पातळी आहे.
केंद्रीय सांख्यिकी विभागातर्फे ही आकडेवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार आयआयपीमध्ये ७५ टक्के वाटा असणा-या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची वाढ ऑगस्टमध्ये
नकारात्मक पातळीत जात १.४ टक्क्यापर्यंत घसरली.
किरकोळ महागाईत घट
भाजीपाला, तृणधान्ये व पेट्रोलियम उत्पादने काही प्रमाणात स्वस्त झाल्याने किरकोळ महागाईत किंचित घट झाली आहे. जुलैमध्ये ७.९६ टक्के असणारी महागाई ऑगस्टमध्ये ७.८ टक्क्यांवर आली आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये किरकोळ महागाई ९.५२ टक्क्यांवर होती.