आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक उत्पादनात संथ वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कूर्मगतीने वाटचाल करीत असलेल्या देशातील औद्योगिक उत्पादनाला यंदाच्या मे महिन्यात किंचितशी गती मिळाली आहे; परंतु निर्मिती, भांडवली वस्तू व खाणकाम क्षेत्राच्या निराशाजनक कामगिरीमुळे या महिन्यात औद्योगिक उत्पादनात केवळ 2.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. औद्योगिक उत्पादनाला पाहिजे त्या प्रमाणात चालना मिळत नसल्याने कदाचित 31 जुलैला जाहीर करणार असलेल्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेला व्याजदर कपातीचा विचार करावा लागेल.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकावर आधारित औद्योगिक उत्पादनामध्ये गेल्या वर्षीच्या मे महिन्यात 6.2 टक्क्यांनी वाढ झाली होती. दरम्यान, यंदाच्या एप्रिल महिन्यासाठीच्या औद्योगिक वृद्धी दरात फेरबदल करून तो अगोदरच्या 0.1 टक्क्यांवरून आता 0.9 टक्के करण्यात आला आहे. वित्तवर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत (एप्रिल-मे) औद्योगिक उत्पादनात लक्षणीय घट होऊन तो अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 5.7 टक्क्यांवरून 0.8 टक्क्यांवर आला. देशाच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण 75 टक्के वाटा असलेल्या निर्मिती क्षेत्राने यंदाच्या मे महिन्यात साफ निराशा करताना केवळ 2.5 टक्के वाढीची नोंद केली. गेल्या वर्षात याच कालावधीत या क्षेत्रात 6.3 टक्क्यांनी वाढ झाली होती. निर्मिती क्षेत्रातील 22 पैकी 12 औद्योगिक गटांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात सकारात्मक वाढीची नोंद केली आहे.
उद्योग क्षेत्रांची कामगिरी
क्षेत्र वाढ (}) मे 11 मे 12
भांडवली वस्तू 6.2 - 7.7
खाण काम 1.8 - 0.9
निर्मिती 6.3 + 2.5
ग्राहकोपयोगी वस्तू 5.1 + 9.3
कन्झ्युमर नॉन ड्युरेबल 9 0.1
ऊर्जा 10.3 +5.9