आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industrial Wheel Slow Down, Industrial Index Come Down By Two Numbers

औद्योगिक चक्र मंदावले, औद्योगिक निर्देशांकाचा दोन वर्षांचा नीचांक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भांडवली तसेच ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादन दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आले. ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) नकारात्मक ४.२ टक्क्यांची नोंद केली. सप्टेंबरमध्ये आयआयपीने सकारात्मक वाढ नोंदवत २.५ टक्क्यांची उसळी मारली होती.

आयआयपीमध्ये ७५ टक्के वाटा असलेल्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने ऑक्टोबरमध्ये नकारात्मक ७.६ टक्क्यांची नोंद केल्याचा फटका औद्योगिक उत्पादनाला बसला. मागणीचे द्योतक समजले जाणा-या भांडवली वस्तूंच्या उत्पादनात ऑक्टोबरमध्ये २.३ टक्के घट झाली, तर ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंचे उत्पादन १८.६ टक्क्यांनी घटल्याने आयआयपी निर्देशांकाला जबर फटका बसला. ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मात्र ऑक्टोबरमध्ये १३.३ टक्के वाढ दिसून आली, वीजनिर्मिती १०.७ टक्क्यांनी, तर खाण क्षेत्राने ५.२ टक्के वाढ दर्शवली आहे.