आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industril Cycle Slow Down,december Cut 0.6 Percent

औद्योगिक चक्र मंद ... डिसेंबरमध्ये 0.6 टक्के घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अर्थव्यवस्थेतील मंदीच्या वातावरणाने देशातील औद्योगिक चक्राची गती पूर्णपणे थंडावल्यासारखी झाली आहे. भांडवली त्याचप्रमाणे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात झालेली घट आणि त्याच्याच जोडीला खाणकाम आणि उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे डिसेंबर महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनात (आयआयपी) लक्षणीय 0.6 टक्क्यांनी घट झाली आहे.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकावर आधारित औद्योगिक उत्पादनात डिसेंबर 2011 मध्ये 2.7 टक्क्यांनी वाढ झाली होती. यंदाच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत औद्योगिक उत्पादनात 0.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2011 - 12 या वर्षातल्या याच कालावधीतील ही वाढ 3.7 टक्के नोंद झाली होती, असे
मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारी आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

आयआयपीचे आकडे निराशाजनक
आयआयपीचे डिसेंबरमधील आकडे निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केली. ऑक्टोबर 2012 मध्ये या निर्देशांकाने केलेल्या कामगिरीप्रमाणे वाढीचा दर अपेक्षित होता, मात्र घडले उलटेच असेही बॅनर्जी म्हणाले.

विविध क्षेत्रांची कामगिरी
क्षेत्र डिसें.2011 डिसें.2012
उत्पादन 2.8 % - 0.7 %
खाणकाम -3.3 % - 4.0 %
भांडवली वस्तू -16.00 0.9 %
ऊर्जा निर्मिती 9.1 % 5.2 %
विद्युत निर्मिती +9.4 4.6 %
ग्राहक वस्तू +12.8 % +0.1 %
ग्राहकोपयोगी वस्तू 10.1 % 4.2 %
बिगर ग्राहकोपयोगी वस्तू 13.8 % 1.4 %
मूलभूत वस्तू 5.5 % 2.6 %