Home | Business | Industries | industry in aurangabad, business

राठींनी उभारलाय करोडोंचा उद्योग

divya marathi | Update - Jun 01, 2011, 02:06 PM IST

औद्योगिकीकरणाची फारशी हवा न लागलेल्या भागात, सत्तरीच्या दशकात उद्योग सुरू करणे तसे साहसच होते. लातूरचे विजय राठी यांनी १९७४ मध्ये तेे धाडस दाखवले आणि या भागात कागद निर्मितीच्या नव्या उद्योगाचा जन्म झाला. प्रारंभी अगदी चार ते पाच लाख रुपये गुंतवणूक असलेल्या राठी यांच्या कल्पकला इंडस्ट्रीजची उलाढाल आज चार कोटी रुपयांवर गेली आहे.

 • industry in aurangabad, business

  संतोष काळे
  औद्योगिकीकरणाची फारशी हवा न लागलेल्या भागात, सत्तरीच्या दशकात उद्योग सुरू करणे तसे साहसच होते. लातूरचे विजय राठी यांनी १९७४ मध्ये तेे धाडस दाखवले आणि या भागात कागद निर्मितीच्या नव्या उद्योगाचा जन्म झाला. प्रारंभी अगदी चार ते पाच लाख रुपये गुंतवणूक असलेल्या राठी यांच्या कल्पकला इंडस्ट्रीजची उलाढाल आज चार कोटी रुपयांवर गेली आहे.
  पारंपरिक कापड उद्योग चांगला चालत असतानाही विजय राठी यांना काहीतरी नवीन करण्याचा ध्यास लागला होता. त्यासाठी अनेक उद्योगांचा विचार त्यांच्या मनात डोकावून गेला. वाहनांसाठी लागणा:या बल्ब निर्मितीचे प्रशिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांनी सर्वप्रथम हाच उद्योग सुरू केला. परंतु या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल जपानवरून आयात होत होता आणि आयातीचा परवाना मिळणे त्या काळी कठीण होते. त्यामुळे त्यांनी या उद्योगावर पाणी सोडले. कपड्याची उधारी वसूल करण्यासाठी लातूरच्या जवळ असलेल्या औसा या गावात गेले असताना त्यांना एके ठिकाणी 'हातकागद केंद्रÓ असा फलक दिसला. तेथून त्यांच्या उद्योगाला कलाटणी मिळाली. हातकागद केंद्राच्या व्यवसायाची प्रेरणा घेऊन त्यांनी या व्यवसायत उडी घेतली. कागदासाठी ऑर्डर मिळवण्याकरिता राठी यांच्या मुंबई, चेन्नई, दिल्ली वा:या सुरू झाल्या. अगदी १ रुपयांच्या ऑर्डरसाठी प्रसंगी त्यांनी दिल्लीपर्यंत धाव घेतली. त्यानंतर आम्ही फिल्टर पेपरची निर्मिती करतो अशी जाहिरात वर्तमानपत्रात दिल्यानंतर सर्व मोठ्या शहरांमधून चौकशी सुरू झाली. पण या कागदाची निर्मिती कशी करावी हेच मुळात माहिती नव्हते. अखेर एका तंत्रज्ञाच्या मदतीने या कागदाच्या उत्पादनाला प्रारंभ झाला. दुसरीकडे राठी यांचे फिल्टर कागद तयार करण्यावर संशोधन सुरू होते.
  औषध, मद्यनिर्मिती, तेल कारखाने, विविध प्रकारची रसायने, वॉटर कू लर आदींमध्ये फिल्टर कागदाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे या कागदाला मुंबई आणि चेन्नईमधून मोठी मागणी असते. त्यामुळे चेन्नईमधून ताबडतोब मोठी ऑर्डर आली. पण इतक्या मोठ्या ऑर्डरसाठी किंमत किती लावायची हेच राठी यांना कळत नव्हते. तसे त्यांनी त्या कंपनीला प्रामाणिकपणे कळवले. आश्चर्य म्हणजे या कंपनीनेही कागदाला चांगली किंमत मोजली. या ऑर्डरनंतर कल्पकला इंडस्ट्रीजने कधी मागे वळून बघितले नाही. मायको बॉशसारख्या मोठ्या वाहन कंपन्यांना फिल्टर कागदाचा पुरवठा करण्याबरोबरच सुरुवातीला या कागदाची निर्यातही करण्यात आली. सध्या निर्यात बंद असली तरी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत प्रत्येक कानाकोप:यात राठींचा कागद आज पोहचत आहे.
  कल्पकला हँडमेड इंडस्ट्रीजमध्येही यांत्रिकीकरण झाल्यामुळे वाहन उद्योगांच्या फिल्टर कागदाच्या गरजा अगदी विनासायास पूर्ण केल्या जातात. विशेष म्हणजे या कागद निर्मिती उद्योगामध्ये परिसरातल्या गावक:यांना विशेष करून निराधार महिला, अंध आणि अपंगांना रोजगार कसा मिळेल याला राठी यांनी जास्त प्राधान्य दिले. त्यासाठी अपंग आणि परित्यक्ता स्त्रियांना हँडमेड पेपर निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना निष्णात बनवण्यात आले.
  कपड्याची उधारी वसूल करण्यासाठी लातूरच्या जवळ असलेल्या औसा या गावात गेले असताना त्यांना एका ठिकाणी 'हातकागद केंद्रÓ असा फलक दिसला. केवळ औत्सुक्यापोटी ते त्या केंद्रात शिरले. योगायोगाने या केंद्रात त्यांच्या वडिलांचे जुने परिचित विमानाचार्य यांच्याशी भेट झाली. त्यांच्याकडून कागद उद्योगाची माहिती घेतल्यानंतर खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून या कागदाची जपानला निर्यात होत असल्याचे कळले. हाच उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेऊन राठी यांनी ७ हजार रुपयांचे कर्ज काढून हा कागद प्रकल्प उभारला आहे.
  ..............................

Trending