आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षातही राहणार महागाईची टांगती तलवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नव्या वर्षातही आर्थिक वाढीवर चढ्या महागाईची टांगती तलवार राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मागील आठवड्यात जाहीर झालेल्या मध्यावधी पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदरात कोणताही बदल झाला नाही; परंतु महागाई नियंत्रणात आणण्यासाठडी रिझर्व्ह बँक प्रमुख व्याजदरात अर्ध्या टक्क्याने वाढ करण्याचा अंदाज ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड सर्व्हेयर्स’ (रिक्स) या जागतिक संस्थेने व्यक्त केला आहे.
किरकोळ महागाई अद्याप चढ्या पातळीवर असल्याने आर्थिक विकासदराची जोखीम अजूनही कायम आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांचा फेरआढावा घेणेही कायम राहील. सध्याच्या घडीला महागाई नियंत्रणाला प्राधान्य देताना मध्यवर्ती बँक व्याजदरात पाव ते अर्ध्या टक्क्याने वाढ करण्याची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे. ब्रिटनमधील रिक्स ही संस्था जमीन, मालमत्ता आणि बांधकामांचे प्रमाणीकरण आणि पात्रता यासाठी कार्यरत आहे. रघुराम राजन यांनी सलग दोन पतधोरण आढाव्यांमध्ये प्रमुख व्याजदरात पाव टक्क्याने वाढ केली होती; परंतु 18 डिसेंबरला जाहीर झालेल्या पतधोरणात मात्र महागाईचे प्रमाण चढे असतानाही रेपो दर 7.75 टक्क्यांवरच कायम ठेवला. राजन म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने घाऊक महागाईसाठी पाच टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे; परंतु ग्राहक किमतीवर आधारित महागाईची सुयोग्य पातळी अद्याप दिसून आलेली नाही. सरकार महागाई आणि औद्योगिक वाढीची आकडेवारी जानेवारी महिन्यात जाहीर करणार आहे.