आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा दिलासा... मार्चमध्ये दर 10.91 टक्क्यांवरून 10.39 टक्के

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजीपाला आणि प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमती काहीशा नियंत्रणात आल्यामुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. या दोन्ही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे सलग पाचव्या महिन्यात मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर घसरून 10.39 टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे भाजीपाल्याच्या किमती फेब्रुवारीतील 21.29 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवरून घसरून याच महिन्यात 12.16 टक्क्यांवर आल्या आहेत.

मार्च महिन्यापर्यंत सलग चार महिने दोनअंकी वाढीची नोंद केल्यानंतर ग्राहक वस्तू निर्देशांकावर आधारित महागाईचा दर फेब्रुवारी महिन्यात घसरून 10.91 टक्क्यांवर आला आहे. अंडी, मांस आणि मासे या प्रथिनयुक्त पदार्थांच्या महागाईचा दर याच महिन्यात 14.56 टक्के नोंद झाला असून तेलाच्या महागाईची नोंद 11.72 टक्के झाली आहे. कपडे आणि चर्म उत्पादनांच्या किमतीत याच महिन्यात 10.64 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शहरी भागातील किरकोळ महागाईचे प्रमाण हे अगोदरच्या महिन्यातल्या 10.84 टक्क्यांवरून कमी होऊन 10.38 टक्क्यांवर तर ग्रामीण भागातील महागाई आधीच्या 11.01 टक्क्यांवरून 10.33 टक्क्यांवर आली आहे.

साखर, डाळी कडाडल्या
ग्राहक वस्तू निर्देशांक सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या कडधान्यांच्या महागाईचा दर मात्र सर्वाधिक 17.55 टक्के, तर डाळींची महागाई 11.38 टक्क्यांवर गेली आहे. वार्षिक आधारावर साखरेच्या महागाईचा दर 11.65 टक्के नोंद झाला.