आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inflation Go To Cheap Way, Wholesale Inflation Rate 6.16 Percent

महागाई स्वस्ताईकडे, डिसेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर 6.16 टक्के

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अखेर महागाईने आता उतरती भाजणी सुरू केली आहे. डिसेंबरअखेर संपलेल्या पाच महिन्यांत घाऊक महागाईचा दर 6.16 टक्के अशा पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. या स्वस्ताईमुळे रिझर्व्ह बॅँकेलादेखील व्याजदर कमी करून आर्थिक वाढीला गती देण्याची पुरेशी उसंत मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर नोव्हेंबर महिन्यात गेल्या 14 महिन्यांत लक्षणीय 7.52 टक्क्यांवर गेला होता. डिसेंबरमधील महागाईची घसरण ही गेल्या वर्षातल्या जुलैपासूनची सर्वात हळुवार झालेली किंमतवाढ आहे. भाजीपाला, कडधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थ स्वस्त झाल्यामुळे डिसेंबरमध्ये महागाईचा ज्वर उतरला.
नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किमती कमी होऊन त्या 190.34 टक्क्यांवरून 39.5 टक्क्यांवर आल्या असल्या तरी एकंदर भाजीपाला मात्र, 57.33 टक्क्यांनी महागला आहे. विशेष म्हणजे बटाट्याचे दर अगोदरच्या महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये 54.65 टक्के असे दुपटीपेक्षा जास्त वाढले आहेत.
अंडी, मांस आणि मासे या प्रथिनयुक्त पदार्थांबरोबरच फळे काही प्रमाणात स्वस्त झाली आहेत. दुधाच्या महागाईत मात्र 6.93 टक्के अशी किंचितशी वाढ झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात महागाई 7.52 टक्के, तर ऑक्टोबरमध्ये ती 7.24 टक्के नोंद झाली होती. या अगोदरच्या आठवड्यातच किरकोळ महागाईदेखील डिसेंबरमध्ये 9.87 टक्के अशा तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली होती. त्याआधीच्या महिन्यात किरकोळ महागाईने दोन अंकी नोंद केली होती.
महागाईचा घटता आलेख
डिसें नोव्हे.
* भाजीपाला : 57.33 % 95.25 %
* कांदा : 13.68 % 19.93 %
* बटाटे : 54.65 % 26.71%
* फळे : 9.07 % ------
* अंडी, मांस : 11.40 % 15.19%
* दूध : 6.93 % 6.25%
* इंधन : 10.78 % 11.08%
* ऊर्जा : 10.98 % 11.08%
* साखर, खाद्यतेल : 2.64 % ------
व्याजदर कपात व्हावी :
०आर्थिक विकासदराला गती देण्यासाठी व्याजदरात कपात करावी, अशी उद्योग क्षेत्राकडून अगोदरपासूनच मागणी होत आहे.
० त्यातून औद्योगिक उत्पादनाने सहा महिन्यांतील घसरणीचा नीचांक गाठला आहे. परंतु आता महागाईने घसरणीचा सूर लावल्याने व्याजदर कमी करावा, असा उद्योग क्षेत्राकडून दबाव वाढला आहे.
० काही तज्ज्ञांनी 28 जानेवारीला रिझर्व्ह बँक व्याजदरात कोणताही बदल करणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे.
औद्योगिक उत्पादनातील घसरण कायम असतानाच महागाई सुसह्य झालेली असल्याने रिझर्व्ह बँकेला आता आर्थिक वाढीला चालना देण्याच्या दृष्टीने आपल्या नाणेनिधी धोरणाचा फेरआढावा घ्यावा लागणार आहे. चढे व्याजदर, मरगळली गुंतवणूक आणि घटलेल्या मागणीचा अर्थवाढीला फटका बसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन देण्यासाठी व्याजदरात कपात करावी.’’ चंद्रजित बॅनर्जी, महासंचालक, सीआयआय.
ग्राहक मागणीत झालेली घट, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाची घसरलेली गाडी लक्षात घेता रिझर्व्ह बँक अल्प मुदतीचे व्याजदर जैसे थे ठेवण्याचा विचार करेल.’’
अदिती नायर, वरिष्ठ अर्थतज्ज्ञ, आयसीआरए.
आर्थिक वाढ आणि महागाई लक्षात घेता रिझर्व्ह बँकेचा व्याजदर वाढीचा कल नसेल आणि आपली सावध भूमिका कायम राहील. दोन आठवड्यांत आरबीआय व्याजदर जैसे थे ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय घेईल असे वाटते.’’ बार्कलेज