आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inflation Increases : Vegatable,edible Oil,cereal

महागाईत वाढ : भाजीपाला, खाद्यतेल, तृणधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमतीत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजीपाला, खाद्यतेल, तृणधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमतीतील वाढीमुळे जानेवारीत किरकोळ महागाई दर 10.79 टक्के झाला. डिसेंबरमध्ये हा दर 9.90 टक्के, तर नोव्हेंबरमध्ये
9.75 टक्के होता.

सरकारतर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये भाजीपाल्याच्या किमतीत सर्वाधिक 26.11 टक्के वाढ झाली. त्याखालोखाल तेलाच्या किमती 14.98 टक्के, तर अंडी, मांस व मासळीच्या किमतीत 13.73 टक्के वाढ झाली. तृणधान्ये 14.90 टक्के, तर कडधान्ये किंमतवाढीचा दर 12.76 टक्के दिसून आला. वार्षिक तुलनेत साखर 12.95 टक्के वाढीने कडाडली. कपडे व पादत्राणांच्या किमती जानेवारीमध्ये 11 टक्क्यांनी वाढल्या.डिसेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांकही 7.24 टक्के पातळीत आहे. रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या 5 ते 6 टक्क्यांच्या पातळीपेक्षा महागाई दर अधिक असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे आगामी पतधोरणात रिझर्व्ह बँक प्रमुख व्याजदरात कपातीबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे
लक्ष आहे.