आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Inflation Lowest In Three Years ; Essential Things Price Still High

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागाईचा दर तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर ; जीवनावश्‍यक वस्तुंच्या किंमतीत फरक नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कांदा, बटाट्यासह रोजच्या आहारातील अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री लागत असतानाही महागाईचा दर जानेवारी महिन्यात घसरून 6.62 टक्क्यांच्या तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला असल्याचे सरकारी आकडेवारीत म्हटले आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव चढे असले तरी उत्पादित वस्तूंच्या किमती झाल्यामुळे जानेवारीमध्ये सलग चौथ्या महिन्यात घसरणीचा सूर लावला आहे. घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये 7.24 टक्के त्यानंतर डिसेंबरमध्ये 7.18 आणि गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये 7.24 टक्के नोंद झाला होता. अधिकृत आकडेवारीनुसार उत्पादित वस्तूंच्या महागाईचा दर अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी होऊन तो जानेवारीत 4.81 टक्क्यांवर आला. डिसेंबरमध्ये 5.04 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंद झाली होती.

कांदा आणतोय डोळ्यांत पाणी
खाद्यान्न आणि प्राथमिक वस्तू गटात वार्षिक किमतीमध्ये सर्वाधिक वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणत कांद्याच्या भावात सर्वाधिक 112.2 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली असून त्या पाठोपाठ बटाट्याचा भाव 79.07 टक्क्यांनी वाढला आहे. त्याशिवाय गहू, भाजीपाला, तांदूळ, तृणधान्ये सगळ्यात महाग झाले आहे.

किरकोळ महागाईची चढती कमान कायम : प्रथिनांवर आधारित वस्तू, खाद्यतेल, भाजीपाला महागल्याने जानेवारी महिन्यात किरकोळ महागाईने 10.79 टक्क्यांची दोनअंकी वाढ नोंदवली आहे.
धान्याचा साठा उपलब्ध करावा
मार्चअखेर महागाई आणखी कमी होऊन 6.5 टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे, किमती सुसह्य होण्यासाठी अन्नधान्याचा जास्त साठा सरकारने वितरित करण्याची गरज आहे.
सी. रंगराजन, अध्यक्ष, पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद

दिलासा मिळणार
मुख्य महागाईमध्ये झालेली घसरण आणि त्याच्याच जोडीला औद्योगिक उत्पादनाची डिसेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा झालेली खराब कामगिरी लक्षात घेता मार्चमधील मध्य तिमाही पतधोरण आढावा आणखी सुसह्य होण्याची शक्यता आहे.’’
आदिती नायर, वरिष्ठ अर्थतज्ज्ञ, इक्रा.

व्याज घटणार
अन्नधान्य साठ्याच्या उपलब्धतेत वाढ करण्यासाठी पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्याची गरज आहे, परंतु मुख्य महागाईचा दर कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बॅँकेला आपल्या मार्च महिन्यातील पतधोरण आढाव्यात अर्धा टक्क्याने व्याजदर करण्यास पुरेसा वाव आहे.’’
चंद्रजित बॅनर्जी, महासंचालक, सीआयआय


आणखी खाली यावी
महागाई अद्याप स्वीकारार्ह पातळीच्यावर असून ती आणखी खाली येणे गरजेचे आहे.’’
मॉँटेकसिंग अहलुवालिया, उपाध्यक्ष, नियोजन आयोग.