आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळी कडाडल्या, देशातील प्रमुख शहरांत डाळी महागल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील अपुऱ्या पावसाने विविध कडधान्यांचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, कडधान्यांचे उत्पादन घटणार आहे. बाजारात मात्र आतापासूनच डाळींचे भाव कडाडले आहेत. मूग डाळीने शतकाकडे वाटचाल सुरू केली असून तूर, उडीद , मसूर डाळीने नवे उच्चांक गाठले आहेत. चेन्नई, मुंबई, कोलकाता या देशातील प्रमुख शहरांत डाळीच्या महागाईने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. काही िदवसांपूर्वी कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आता ऐन सणासुदीत चढ्या दरात डाळ खरेदी करावी लागत आहे.

देशातील प्रमुख शहरांत डाळीचे भाव गगनाला िभडत आहेत. चेन्नईमध्ये तूर, उडीद व मूग डाळीसाठी ग्राहकांना िखसा रिकामा करावा लागत आहे. िदल्ली, मुंबई आणि कोलकाता येथेही यापेक्षा वेगळी िस्थती नाही. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मूग डाळीच्या िकमती गेल्या वर्षीच्या ७२ रुपये िकलोवरून सध्या ९९ रुपयांवर गेल्या आहेत. त्याचप्रमाणे उडीद डाळ ६१ रुपयांवरून ९० रुपये िकलोवर पोहोचली आहे, तर तूर डाळीने ७१ रुपये िकलोवरून ८१ रुपयांपर्यंत पल्ला गाठला आहे. प्रक्षेत्र संशोधन व सल्लागार संस्था अ‍ॅग्री वॉचच्या सीईओ व्ही.एन. सरोजा यांनी सांगितले, खरीप हंगामातच या तीनही डाळींनी २०१२ ची िकंमत पातळी ओलांडली आहे. घाऊक व किरकोळ बाजारात डाळींच्या िकमती वाढत असून मागणी घटत असल्याचे िचत्र आहे.
रब्बीवर नजर : प्रमुख कडधान्ये रब्बी हंगामात येतात. पुढच्या महिन्यापासून रब्बी हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे डाळींचा तुटवडा जाणवणार नाही, याची सरकारने योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे अ‍ॅग्रीवॉचचे मत आहे.

सणांत डाळीचे वांधे
देशात आता सणांचा हंगाम सुरू झाला आहे. नवरात्रोत्सव, दसरा, िदवाळी असे सण एकामागे एक आहेत. या सणांमध्ये डाळींना मोठी मागणी असते. नेमके सणासुदीत डाळींचे भाव िकलोमागे पाच ते १० रुपयांनी वाढल्याने ग्राहकांना झळ पोहोचली आहे.

१९२.७ लाख टन देशातील कडधान्यांचे उत्पादन
२१० ते २२० लाख टन देशातील कडधान्यांची मागणी
ही आकडेवारी २०१३ ची असून मागणी पूर्ण करण्यासाठी कडधान्यांची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागली होती.