आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inflation News In Marathi, Divya Marathi, Business

महागाईचा ५ वर्षांचा नीचांक, सलग तिस-या महिन्यात घाऊक महागाई दरात घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सलग तिसऱ्या महिन्यात घाऊक महागाई दरात घसरण होऊन तो ऑगस्टमध्ये ३.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही पाच वर्षांतील नीचांक आहे. ऑक्टोबर २००९ मध्ये घाऊक महागाई दर १.८ टक्के इतका होता.

सरकारी आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या दरात घसरण झाल्यामुळे महागाई दर घसरला आहे. जुलैत खाद्यपदार्थांची महागाई ८.४३ टक्के इतकी होती. ती ऑगस्टमध्ये ५.१५ टक्क्यांवर आली. जानेवारी २०१२ नंतरची ही नीचांकी पातळी आहे. अॉगस्टमध्ये किरकोळ महागाई दरही जुलैच्या ७.९६ टक्क्यांवरून ७.८ टक्क्यांवर आला होता. गेल्या महनि्यात भाजीपाल्याच्या किमतीत ४.८८ टक्क्यांची घसरण झाली. कांदा तर ४४.७ टक्क्यांनी स्वस्त झाला. बटाट्याचे दर मात्र ६१.४१ टक्क्यांनी वाढले. जुलैतही बटाटा ४६.४१ टक्क्यांनी महागला होता. फळांच्या किमती २०.३१ टक्क्यांनी वाढल्या. इंधन व ऊर्जा श्रेणीतील महागाई दर ४.५४ टक्के होता.

महागाईचा आलेख
स्वस्त - भाजीपाला : ४४.७ %, फळे : २०.३१ % , साखर, खाद्य तेल : ३.४५ % (३.६७ %) (कंसात जुलैची िस्थती )
महाग - बटाटा : ६१.६१ % (४६.४१ %), दूध : १२.१८ %, डाळी : ७.८१ %
इंधन महागाई : एलपीजी, पेट्राेल, िडझेल : - ४.५४ % (७.४० % जुलैमध्ये)

उद्योग क्षेत्राकडून व्याजदर कपातीची मागणी
महागाईने पाच वर्षांचा नीचांक गाठताच उद्योग जगताने रिझर्व्ह बँकेकडे व्याजदरांत कपातीची मागणी केली आहे. आरबीआय ३० सप्टेंबरला आगामी पतधाेरणाचा आढावा घेणार आहे. पीएचडी चंेबरचे अध्यक्ष शरद जयपुरिया म्हणाले, उद्योग जगत चढे व्याजदर व महागड्या कच्च्या मालाच्या समस्येला तोंड देत आहे. त्यांना विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी रेपो दरात कपात गरजेची आहे. असोचेमचे सरचिटणीस डी.एस. रावत म्हणाले, भांडवलावर उद्योगांचा कमी खर्च व्हावा याची काळजी आरबीआयने घेणे गरजचे आहे. सीआयआयचे संचालक चंद्रजित बॅनर्जी म्हणाले, सरकारने अनेक पावले उचलल्यामुळे महागाई घटत आहे. यामुळे आरबीआयने आता व्याजदर कपात करावी.
घाऊक महागाईची चाल
३.७४ टक्के ऑगस्टमध्ये
५.१९ टक्के जुलैमध्ये
६.९९ टक्के ऑगस्ट २०१३

तूर्तात दर कपात नाही, आधी उद्योगांनी किमती घटवाव्या : राजन
महागाई घटली तरीही तूर्तास व्याजदरांत कपात होणार नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिले आहे. िफक्कीच्या एका कार्यक्रमात ते म्हणाले, फक्त खाद्यपदार्थच नव्हे, तर इतरही वस्तूंचे दाम अद्यापही चढेच आहे. सर्व वस्तूंचे दर कमी झाल्यानंतरच व्याज दरकपात केली जाईल. दरकपातीच्या उद्योगांकडून होणाऱ्या मागणीवर ते म्हणाले की, एकीकडे ते दर वाढवत आहेत, तर दुसरीकडे व्याजदर घटवण्याची मागणी करत आहेत. एका सेकंदासाठीही व्याजदर चढे ठेवण्याची आपली इच्छा नाही. मात्र आता व्याजदर कमी केल्यास महागाई पुन्हा डाेके वर काढण्याची शक्यता आहे. आरबीआयने जानेवारी २०१५ पर्यंत ८ टक्के व जानेवारी २०१६ पर्यंत ६ टक्के किरकोळ महागाईचे उद्दिष्ट ठेवले आहे.