आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inflation News In Marathi, Farming Labour, Rural Workers, Divya Marathi

शेतमजूर, ग्रामीण कामगारांनाही किरकोळ महागाईचा दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अन्नधान्याच्या किमती घटल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषकरून शेतमजूर आणि ग्रामीण कामगारांच्या किरकोळ महागाई दरात घट झालेली असून तो फेब्रुवारी महिन्यात अनुक्रमे 8.14 टक्के आणि 8.27 टक्क्यांवर आला आहे. त्याअगोदरच्या महिन्यात महागाईचे हेच प्रमाण अनुक्रमे 9.08 टक्के आणि 9.21 टक्के होते.
शेतमजूर आणि ग्रामीण कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या अन्नधान्य निर्देशांकावर आधारित महागाईचे प्रमाण फेब्रुवारीत कमी होऊन ते अनुक्रमे 6.85 टक्के आणि 6.99 टक्क्यांवर आले आहे. शेतमजुरांसाठीचा निर्देशांक अकरा राज्यांमध्ये 2 ते 9 अंकांच्या दरम्यान वाढला, तर आठ राज्यांत तो 1 ते 9 अंकांच्या दरम्यान घसरला आहे; परंतु एकाच राज्यात तो स्थिर असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण कामगारांचा निर्देशांक बारा राज्यांमध्ये 1 ते 7 अंकांनी वाढला असून आठ राज्यांमध्ये तो 1 ते आठ अंकांनी घटला आहे. आंध्र प्रदेशात तांदूळ, ज्वारी, रागी, भुईमूग, तेल, कांदा, भाजीपाला, फळे, साखर आदींचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे या राज्यात कृषी आणि कामगारांच्या निर्देशांकात सर्वाधिक 9 आणि 8 टक्क्यांनी अनुक्रमे घट झालेली आहे.