आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा: घाऊक महागाई घटली, स्वस्ताई आली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजीपाल्यासह अन्नधान्याने व पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये घाऊक महागाई घसरून २.३८ टक्क्यांवर आली आहे. यामुळे व्याजदर कपातीचे संकेत मिळाले आहेत. त्यातून कर्ज स्वस्त होण्याची आशा आहे. घाऊक महागाई गेल्या वर्षात ७.०५ टक्क्यांवर जाऊन पोहोचली होती. ती ऑगस्टमध्ये ३.७४ आणि आता सप्टेंबरमध्ये २.३८ टक्क्यांवर आली आहे. सप्टेंबरमध्ये ही महागाई विक्रमी ६.४६ टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर आली. घाऊक महागाईदेखील ओसरल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

रिझर्व्ह बँकेला संधी
महागाईने पाच वर्षांचा तळ गाठल्याने उद्योग जगत आनंदले आहे. आता औद्योगिक विकासाची चक्रे गतिमान करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला व्याजदर कमी करण्याच्या दृष्टीने चांगली संधी आता निर्माण झाली असल्याचे मत उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

व्याजदर कपातीला वाव
रिझर्व्ह बँकेने जानेवारीपासून व्याजदरात बदल केलेला नाही. वाढती महागाई, भौगोलिक राजकीय घडामोडी लक्षात घेऊन मागील महिन्यातल्या नाणेनिधी धोरण आढाव्यातही ‘व्याजदरा’ला हातही लावला नव्हता. कमी होत चाललेली महागाई, उशिराचा पाऊस, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढवण्याची अपेक्षा या सगळ्या घटकांसह व्याजदर कपातीसाठी पुढील वर्षापासून पोषक वातावरण तयार होईल. त्यामुळे पुढील वर्षाच्या जानेवारीपर्यंत महागाई निर्धारित ८ टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता असल्यामुळे रिझर्व्ह बॅंक फेब्रुवारी महिन्यापासून व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल, असा अंदाज आहे.
दूध, अंडी, मांस आणि मासे यांच्या किमतीत सातत्याने घट,फळांच्या किमतीत मात्र किंचित वाढ