आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ महागाईत घट; औद्योगिक उत्पादनात वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजीपाला, तृणधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थ स्वस्त झाल्याने मे महिन्यात किरकोळ महागाई घसरून 8.59 टक्क्यांवर आली. ग्राहक किंमत निर्देशांक म्हणून ओळखली जाणारी किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 8.59 टक्के होती.

मेमध्ये भाजीपाला 15.67 टक्क्यांनी स्वस्त झाला, तर गहू, तांदूळ, ज्वारीसारख्या तृणधान्याच्या किमती 8.81 टक्क्यांवर आल्या. एप्रिलमध्ये तृणधान्ये 9.67 टक्के महागली होती. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या किमती एप्रिलच्या तुलनेत 11.42 वरून मेमध्ये 11.28 टक्के झाल्या आहेत.

औद्योगिक उत्पादनात वाढ
सहा महिन्यांपासून मंदावलेल्या औद्योगिक उत्पादनाच्या चक्राला एप्रिलमध्ये गती आली आहे. मॅन्युफॅक्चरिंग, खाण आणि ऊर्जा क्षेत्राच्या चमकदार कामगिरीमुळे एप्रिलमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकांत (आयआयपी) 3.4 टक्के वाढ झाली. त्याआधीच्या दोन महिन्यांत औद्योगिक उत्पादन नकारात्मक पातळीत होते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली.ऑक्टोबर ते डिसेंबर 2013 या काळात औद्योगिक उत्पादन नकारात्मक पातळीत होते. जानेवारीत औद्योगिक उत्पादनाने पुन्हा सकारात्मक पातळी नोंदवली होती.