आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा पाच वर्षांचा नीचांक, घाऊक महागाई दर ऑक्टोबरमध्ये १.७७ टक्क्यांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंधन आणि अन्नधान्याच्या किमती घसरल्यामुळे महागाईच्या झळादेखील कमी झाल्या आहेत. आॅक्टाेबरमध्ये महागाईचा दर कमी हाेऊन ताे २.३८ टक्क्यांवरून (सप्टेंबर) १.७७ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे महागाईने पाच वर्षांचा नीचांक गाठल्यामुळे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करण्याचा विचार करेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

घाऊक महागाईने सलग पाचव्या महिन्यात घसरणीचा सूर लावला आहे. त्याच्याच जाेडीला किरकाेळ महागाईदेखील आॅक्टाेबरमध्ये ५.५२ टक्के अशा विक्रमी नीचांकी पातळीवर आली आहे. अन्नधान्याच्या महागाईचा दरदेखील २.७ टक्क्यांच्या अडीच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.
एलपीजी, पेट्राेल आिण डिझेलचा समावेश असलेली इंधन आणि वीज महागाई सप्टेंबरमधील १.३३ टक्क्यांच्या तुलनेत कमी हाेऊन ती ०.४३ टक्क्यांवर आली आहे. दुस-या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीदेखील प्रति बॅरल ७७ डाॅलरवर आल्यामुळेदेखील माेठा आधार मिळाला आहे. त्यामुळे दाेन डिसेंबरला जाहीर हाेणा-या नाणेनिधी धाेरण आढाव्यात रिझर्व्ह बँक व्याजदर कपातीबाबत विचार करेल, असा सूर आळवला जात आहे.

नजरा रिझर्व्ह बँकेकडे
किरकोळ महागाईने ऑक्टोबरमध्ये ५.५२ टक्के, तर घाऊक महागाईने १.२२ टक्के अशी नीचांकी पातळी नोंदवली आहे. स्वस्त कर्जाच्या मार्गातील महागाईने स्वस्ताईचा कल दाखवल्याने प्रमुख व्याजदर कपातीचा मार्ग मोकळा झाल्याची भावना व्यक्त होत आहे . रिझर्व्ह बँक येत्या दोन डिसेंबर रोजी नाणेनिधी धोरणाचा आढावा घेणार आहे. त्यात प्रमुख व्याजदरात कपात करण्याची संधी रिझर्व्ह बँक साधणार का? या चर्चेला अर्थजगतात उधाण आले आहे. रिझर्व्ह बँकेने मात्र प्रमुख व्याजदरात कपात करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कर्ज स्वस्त होऊन ईएमआयचा भार कमी होणार का, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

व्याजदर कपातीची संधी
चढ्या पातळीवर असलेली महागाई उतरल्यामुळे रिझर्व्ह बँकेला पुढील महिन्यात हाेत असलेल्या नाणेनिधी धाेरणात व्याजदर कमी करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. - फिक्की
महागाईत अपेक्षेपेक्षा जास्त घट झाली आहे; परंतु तरीही मध्यवर्ती बँक पुढील दाेन नाणेनिधी धाेरणात व्याजदर जैसे थे ठेवण्याची शक्यता आहे. - अदिती नायर, वरिष्ठ अर्थतज्ज्ञ, इक्रा

महागाईचा घटता क्रम

कांदा : ५९.७७ %, (५८.१२ %)
भाजीपाला : १९.६१ %, (१४.९८ %)
अंडी, मांस, मासे : २.५८ %, (२.६० %)
बटाटा : ८२.११ % (९०.२३ %),
साखर, खाद्यतेल, सिमेंट : २.४३ % (०२.८४ %),
(कंसातील आकडे सप्टेंबरमधील वाढ)