आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Information About Amercian National Electronic Security Program Prism

PHOTOS: जाणून घ्‍या जगाची हेरगिरी करणा-या अमेरिकेच्‍या 'प्रिझम' प्रोजेक्‍टबद्दल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून चालवण्यात येत असलेल्या ‘प्रिझम’ या गुप्त कार्यक्रमाचा भंडाफोड झाल्यानंतर यावर जगभरात टीकेची झोड उठली आहे. काय आहे हा प्रिझम प्रोजेक्ट...

‘प्रिझम’ हा अमेरिकन सरकारचा एक कार्यक्रम आहे. याअंतर्गत अमेरिकन सरकार इंटरनेट डाटा गोळा करत होती. हा कार्यक्रम अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (एनएसए) चालवत आहे. याची सुरुवात 2007 पासून झाली होती. या हेरगिरी कार्यक्रमांतर्गत अमेरिकेचे गुप्तहेर अधिकारी मोठय़ा प्रमाणात इंटरनेट वापरकर्त्यांच्या खासगी ऑनलाइन माहितीवर नजर ठेवून होते. यामध्ये प्रामुख्याने फोटो, ई-मेल, लाइव्ह चॅट आणि सर्व प्रकारच्या फाइल्सचा समावेश होता. सोबतच टेलिफोन कॉलवरही पाळत ठेवली जात होती. या प्रकल्पाअंतर्गत फेसबुक, अँपल, गुगल, याहू इत्यादी कंपन्यांच्या डाटावरही नजर ठेवण्यात आली. यासाठी एनएसएने एक प्रकारे थेट या कंपन्यांच्या सर्व्हरमध्येच प्रवेश मिळवला होता. म्हणजेच अमेरिकेसह जगातील सर्वच देशांतील इंटरनेट वापरकर्त्यांनी जे काही केले आहे त्याची माहिती अमेरिकन सरकारला मिळाली तसेच ती गोळा करून ठेवली. अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...