आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिक आराम, कमी आवाज आणि अनेक गुणांसह मर्सिडीझ ई-क्‍लास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मर्सिडीझ ई-क्लास (250 सीडीआय)ला आता तोड नाही. चार वर्षांपासून या कारची चलती कायम आहे. आता तर लक्झरी कार बाजारात ही कार सीनियर सिटिझन ठरत आहे. मधल्या कालावधीत बाजारात अनेक लक्झरी कार येऊन गेल्या, पण या कारचे स्थान अढळ ठरले आहे. आता काही बदलांनंतर कार फ्रेश लूकमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

प्रथमच कारचा लोगो तिच्या ग्रीलवर बसवण्यात आला आहे. जुन्या कारमध्ये हा वर लावलेला असायचा. तरुणांना आकर्षित करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. कारच्या हेडलाइटबरोबरच टेल लॅम्प आणि बम्परमध्येही बदल करण्यात आले आहेत. कारही तरुण दिसावी म्हणून हे बदल केले आहेत. काहीसा स्पोर्टी लूकही देण्यात आला आहे.

इंटेरिअरमध्ये फारसे बदल नाहीत. तरीही पाठीला पूर्वीपेक्षा अधिक आराम मिळू शकतो. नीट आठवून पाहाल तर कमांड स्क्रीन आता अधिक मोठी केल्याचे जाणवेल. त्यात हायर रिझोल्युशनचे चांगले ग्राफिक्स असल्याचे जाणवते. त्यानंतर नेव्हिगेशन बटण दाबल्यानंतर इतर काय बदल करण्यात आले आहेत हे लक्षात येते. यात 17.8 सेंटिमीटरचा कलर डिस्प्ले, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, यूएसबी आणि ब्लूटूथसह हार्डडिस्क नेव्हिगेशनही मिळेल.

एकदा गाडीचा दरवाजा बंद केला तर बाहेरचा किंचितही आवाज येणार नाही. डॅशबोर्डच्या डिझाइनमध्ये मात्र काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. पार्किंग ब्रेक पायाने चालतात. ते इतर इलेक्ट्रॉनिक कारप्रमाणेच काम करतात.

कारमध्ये मागच्या सीटचे कुशनही बदलण्यात आले आहेत. सीट कमी करून लेगरूम वाढवण्यात आले आहे. त्यामुळे अधिक आरामात बसता येईल. नवीन ई-क्लासमध्ये ट्विन स्क्रोल टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. त्याचा जास्त आवाज होत नाही. ई-क्लासमध्ये समोरच्या पॅसेंजर सीटमध्ये सीटर मेमरीही आहे. त्याचबरोबर नवीन डायरेक्ट कंट्रोल सस्पेन्शनही आहे. त्यामुळे मर्सिडीझ संपूर्ण जगभरात वेगळी ठरते. त्याचे कंट्रोलिंग चांगले असल्यामुळे कार चालवताना एक वेगळाच अनुभव मिळतो. त्यामुळे सर्वदृष्ट्या ही कार शानदार ठरते.

त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने गाडीमध्ये आठ एअरबॅग आहेत. चालक आणि समोर बसणा-याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात साइड इम्पॅक्ट आणि विंडो एअरबॅगही आहे. अँटी स्किड रेझिस्टंटबरोबरच ब्रेकला इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी देण्यात आलेली आहे. जर कार चालवताना ड्रायव्हरला झोप येत असेल तर त्याला धोक्याची सूचनाही मिळू शकते.