आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Information Of Indian Scout Is A Perfect First Bike

ही आहे इंडियन कंपनीची नवी दमदार क्लासिक क्रूझर बाइक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही इंडियन कंपनीची नवी स्काऊट बाइक आहे. या बाइकला क्लासिक क्रूझर व दर्जाच्या बाबतीत पॉवर क्रूझर म्हणणे वावगे ठरणार नाही. बाइकची किंमत ११ लाख असून सीट्स हँड स्टिच्ड आहेत.
* दमदार व सुंदर या दोन्हींचा संयोग असणा-या बाइक्स हे इंडियन मोटारसायकलचे वैशिष्ट्य आहे. १९२० पासून ही कंपनी बाइक उत्पादनात आहे. याच्या नावावरून ही भारतीय कंपनी वाटते. मात्र, ही इंडियन बाइक कंपनी अमेरिकन आहे. फक्त कंपनीचे नाव भारतीय आहे. या बाइकची स्पर्धा स्वत:च्याच मॉडेल्सशी राहिली आहे.

* या बाइकला सर्वप्रथम चार्ल्स डी फ्रँकलिनने डिझाइन केले होते. पहिल्या मॉडेलचे नावही स्काऊट होते. या बाइकमध्ये व्ही ट्विन इंजिन होते. सुरुवातीला याचे इंजिन ६०६ सीसी होते. नंतर ७४५ सीसीचे इंजिन करण्यात आले.

* आता कंपनी नव्या लूकच्या बाइक लाँच करत असून बाइकच्या मोहात पडण्याइतक्या त्या सुंदर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. बाइक डिटेलिंगमधेही वेगळेपण आहे.

* कोणतीही क्रूझर क्रोमशिवाय सादर केली जात नाही. स्काऊटमध्ये यावर विशेष लक्ष दिले आहे. इंजिन, अलॉय व्हील्स, फोर्क स्लायडर्स व ट्रीपल क्लॅम्पमध्ये याचा वापर केला आहे.

* गाडीचे सीट हँडस्टिच्ड आहे. त्यामुळे रायडरला आरामदायक वाटते. ११.९९ लाख रुपये खर्च केल्यावर रायडिंगही तेवढी शानदार वाटते. ६३५ मि.मी. उंची सीटला देण्यात आली आहे.

* इंजिन ११३३ सीसीचे आहे. ६ गिअरची गाडी पळवणेही कौशल्यच आहे. शेवटच्या गिअरमधे या बाइकचा वेग ताशी
१०० कि.मी. होतो.

* २५८ किलो वजनाची ही बाइक आहे. व्हीलबेस १५६२ एमएमचा आहे. समोरचे व्हील १३०/ ६० बाय १६ इंची आहे.
मोठ्या खड्ड्यावर वा गतिरोधकावर जास्त वेगाने गाडी पळवणे केवळ अशक्यच आहे.

* टायरवर लो प्रेशर असेल, तर जास्त आत्मविश्वासाने चालवता येईल. समोरचे टायर २९८ एमएम सिंगल डिस्क एबीएस असल्याने गाडीला थांबवणे सोपे जाते.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, ११ लाखाच्या क्लासिक बाईकची छायाचित्रे...