आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटी क्षेत्रात ताशी वेतन रु. ३४२, मॉन्स्टर इंडियाची पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील विविध क्षेत्रांतील वेतनांच्या सर्वेक्षणात आयटी क्षेत्रातील वेतन सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. या क्षेत्रात प्रत्येक कर्मचारी ताशी ३४१.८ रुपये कमावतो. दुस-या क्रमांकावर फायनान्स क्षेत्रातले कर्मचारी असून त्यांचे ताशी वेतन किमान २९१ रुपये आहे. मॉन्स्टर इंडियाने हा सर्व्हे केला असून त्याचा अहवाल नुकताच प्रकाशित केला.

मॉन्स्टर वेतन निर्देशांकानुसार बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी ताशी २५९ रुपये, शिक्षण क्षेत्रात ताशी १८६.५ रुपये, आरोग्य क्षेत्रात २१५ रुपये, तर विधी क्षेत्रातील व्यावसायिकांना ताशी २१५.६ रुपयांची कमाई होते. उत्पादन व वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी ताशी २३०.९ रुपये कमावत असल्याचे यात निष्पन्न झाले.

पुढे पाहा अहवालातील सहा क्षेत्रे आणि त्यातील वेतन