आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Infosys Gives 6 7% Wage Hike To Employees News In Divya Marathi

इन्फोसिसच्या कर्मचार्‍यांना सात टक्के वेतनवाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कर्मचारी गळतीमुळे अगोदरच माहिती तंत्रज्ञान कंपन्या हैराण झाल्या आहेत. गळती थांबवतानाच कर्मचार्‍यांचे मनोबल उंचावण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिसने आपल्या कर्मचार्‍यांवर बढत्यांसह सवलतींचा पाऊस पाडला आहे. कंपनीने कर्मचार्‍यांना सहा ते सात टक्के वेतनवाढ दिली आहे. ऑनसाइट कामगारांना एक ते दोन टक्के पगारवाढ दिली असून त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात येणार असल्याचे कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी राजीव बन्सल यांनी सांगितले.

पगारवाढ आणि बढतीची अंमलबजावणी आणि नवीन व्हिसामधील गुंतवणूक याचा पहिल्या तिमाहीतील मार्जिनवर तीन टक्के परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

आर्थिक वर्ष 2014 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने 10,997 कर्मचार्‍यांची (ढोबळ) भर घातली असून यंदाच्या आर्थिक वर्षात 39,985 कर्मचार्‍यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे एकूण कर्मचार्‍यांची संख्या 1,60,405 वर गेली आहे.

इन्फोसिसच्या नफ्यात 25 टक्के वाढ
मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत इन्फोसिसच्या निव्वळ नफ्यात 25 टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत इन्फोसिसने 2394 कोटींचा नफा कमावला होता, यंदाच्या तिमाहीत 2992 कोटी रुपये नफा झाला आहे. कंपनीच्या महसुलातही या तिमाहीत 23.2 टक्के वाढ झाली आहे.