आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INFOSYS च्‍या सीईओला 30 कोटीचे पॅकेज, या व्यतिरिक्त मिळणार 20 लाख डॉलर्सचे शेअर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसीसचे नवनिर्वाचीत सीईओ म्‍हणून विशाल सिक्का यांची निवड करण्‍यात आली आहे. सीईओ म्‍हणून निवड झालेल्‍या विशाल सिक्का यांचे वार्षिक पॅकेज 50.8 लाख डॉलर ( 30.6 कोटी रूपये ) राहणार आहे. याशिवाय इन्‍फोसीस कंपनीमध्‍ये त्यांना 20 लाख डॉलरचे शयर्स देण्‍यात येणार आहेत. 47 वर्षांचे सिक्का एक ऑगस्‍टपासून सीईओचा पदभार सांभाळणार आहेत. ते सध्‍याचे सीईओ एस. डी. शिबुलाल यांची जागा घेणार आहेत.
30 जुलैला शेयर्स होल्डर्सची एक्‍स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंगचे आयोजन करण्‍यात आले आहे. या मीटिंगमध्‍ये एकमताने विशाल सिक्का यांची सीईओ म्‍हणून निवड करण्‍यात येणार आहे.
कोण आहेत विशाल सिक्का
गुजरामधील बडोदरामध्‍ये सिक्का यांचा जन्‍म झाला. सिक्का यांचे वडील भारतीय रेल्‍वे विभागात अधिकारी म्‍हणून काम करत होते. बडोदराच्‍या एमएस विद्यापीठामध्‍ये सिक्का यांनी कम्‍प्यूटर इंजीनियरिंगची पदवी घेतली. यानंतर या विषयात डॉक्‍टरेट मिळवली. 2002 मध्‍ये सिक्का यांनी सॅपमध्‍ये नोकरी करायला सुरूवात केली. 2007 मध्‍ये या कंपनीचे सिटीओ म्‍हणून सिक्का यांची निवड करण्‍यात आली. यावेळी ते सीईओला अहवाल देण्‍याचे काम करत असत. 2008 मध्‍ये सिक्का यांच्‍या कारचा अपघात झाला. या अपघातामध्‍ये ते बचावले. कुणालाही गंभीर इजा झाली नाही. या अपघातानंतर सिक्का यांनी नोकरी सोडण्‍याचा निर्णय घेतला.
नोकरी सोडण्‍यासाठी कंपनीच्‍या संस्‍थापकाला भेटण्‍यासाठी सिक्का गेले. संस्‍थापकाने नोकरी सोडण्‍याचे कारण विचारले. यावेळी तंत्रज्ञानाच्‍या क्षेत्रामध्‍ये काम करणार असल्‍याचे सिक्का यांनी सांगितले. हे काम करण्‍यासाठी सॅप कंपनीमध्‍ये काम करण्‍याचे स्‍वातंत्र सिक्का यांना देण्‍यात आले. या काळात सिक्का यांनी परफॉमर्स ऍनालिटिक्‍स अप्‍लायन्‍स ( HANA) तयार केले. HANA हे सॅपचे सर्वात जास्‍त प्रमाणात विकले जाणारे प्रोडक्‍ट ठरले.