आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Infosys Shares Surge 9% As Murthy Returns As Chairman

नारायण मूर्तींच्या पुनरागमनामुळे इन्फोसिसच्या शेअरमध्ये 9 टक्केपर्यंत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या काही दिवसापासून आर्थिक पातळीवर झगडत असलेली आयटी क्षेत्रातील तगडी कंपनी इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांसाठी एक सुवार्ता आहे. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी कंपनीत पुन्हा एकदा कार्यकारी चेअरमनपद भूषविण्याचा निर्णय घेताच कंपनीचे शेअर सुमारे 9 टक्केपर्यंत वर गेले.

आज सकाळी शेअर बाजार उघडताच इन्फोसिसच्या शेअरने 2407 रूपयांवरून थेट 2524 रुपयांवर उडी मारली. त्यानंतर थोड्याच वेळात या शेअरने उसळी घेत 2624 रुपयांचा टप्पा गाठला. मात्र, त्यानंतर शेअरमध्ये घसरण होत गेली. दुपारी 1 वाजता इन्फोसिसच्या एका शेअरची किंमत 2512 होती व एकून वाढ 4.35 टक्के होती.

गेल्या काही दिवसापासून इन्फोसिस संघर्ष करीत आहे. देशातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीचा मान असलेल्या या कंपनीला मात्र मागील वर्ष खराब गेले. कंपनीचे शेअर्स 2000 हजार रूपयांपर्यत घसरले होते. मात्र त्याचवेळी चांगली कामगिरी केली होती. मात्र टीसीएस, एचसीएल व कॉग्निझंट यासारख्या स्पर्धक कंपन्यांनी इन्फोसिसला धोबीपछाड दिल्याने कंपनीचे अध्यक्ष के. व्ही. कामत यांनी पायउतार होण्याचा निर्णय मागील दोन दिवसापूर्वी घेतला होता. तसेच नारायण मूर्ती यांनी कार्यकारी अध्यक्षपद पुन्हा सांभाळावे, अशी कंपनीच्या मंडळाने विनंती केली होती. मूर्ती यांनी शुक्रवारी तत्काळ कारभाराची सूत्रे हाती घेतली होती. ही घडामोड घडताच आज कंपनीचे शेअर झेपावले व गुंतवणूकदरांना मोठा दिलासा मिळाला. कंपनीच्या मंडळाची येत्या 15 जूनला बैठक बोलावली असून, त्याद्वारे मूर्तींकडे सोपवलेल्या जबाबदारीची औपचारिकता पूर्ण होईल.