आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी विमा कंपन्यांना पसंती; असोचेमचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - साधारण विमा क्षेत्रात सरकारी कंपन्यांचा बोलबाला असला तरी आरोग्य विम्यात मात्र खासगी कंपन्यांचीच चलती आहे. आरोग्य विमा उतरवणार्‍या 65 टक्के लोकांचा विमा हा खासगी कंपन्यांजवळ आहे. या क्षेत्रात सरकारी कंपन्यांची हिस्सेदारी फक्त 35 टक्के आहे.

उद्योग जगतातील अग्रगण्य संघटना असोचेमने आपल्या अहवालात सांगितले की, आरोग्य विमा क्षेत्रातील 65 टक्के बाजारावर खासगी कंपन्यांचा कब्जा आहे. तथापि, विमा प्रीमियमच्या हिशेबाने आजही सरकारी मालकीच्या विमा कंपन्यांच पुढे आहे.

अहवालातील महत्त्वपूर्ण नोंदी
० देशातील मध्यम व उच्चभू्र वर्ग खासगी विमा विकत घेण्यात सक्षम आहे. यामुळे आगामी काळात आरोग्य विमा क्षेत्रात खासगी कंपन्यांनी हिस्सेदारी आणखी वाढणार आहे.
० महानगरे व प्रथम श्रेणीतील शहरे वगळता इतर ठिकाणी ग्राहक बनवणे खासगी कंपन्यांसाठी आजही मोठे आव्हान म्हणून कायम राहिल.
० संख्येच्या हिशेबात एजंटांकडून सर्वाधिक ग्राहक जोडले जातात. प्रीमियमच्या हिशेबाने सर्वाधिक उत्पन्न हे थेट विक्रीच्या माध्यमातून होते. यानंतर एजंट व ब्रोकर्सचा नंबर लागतो.