आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्शुरन्स: आरोग्य विमा पॉलिसीबाबत तुमची माहिती वाढवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉस्पिटलमध्ये झालेल्या खर्चाची भरपाई करण्यास आरोग्य विम्याची मोठी मदत होते. विम्याच्या दाव्यासाठी पॉलिसीधारक हॉस्पिटलमध्ये किमान 24 तास दाखल असणे गरजेचे आहे. या विम्याअंतर्गत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या 30 दिवसांआधी आणि नंतर 60 दिवसांपर्यंतच्या खर्चावर कव्हर मिळते. आधीपासूनच असलेले आजार पॉलिसी घेतल्याच्या 24 ते 48 महिन्यांपर्यंत कव्हर होऊ शकतात. या पॉलिसींमध्ये औषधांचा खर्च, रूम भाडे, डॉक्टरची फीस, व्हिजिटिंग स्पेशालिस्टची फीस, ऑपरेशन, विविध चाचण्या, रुग्णवाहिका आदींचा खर्च कव्हर होतो.
1. सबलिमिट्स : काही कंपन्यांनी क्लेमसाठी आजार आणि उपचारांच्या भौगोलिक स्थितींचे ध्यान ठेवत काही मर्यादा आखून ठेवलेल्या आहेत. त्यांना सबलिमिट्स असे संबोधले जाते.
2. लोडिंग : जर पॉलिसीच्या आधारावर आधी क्लेम केलेला असेल तर काही कंपन्या त्याच्या नूतणीकरणावर लोडिंग चार्जेस आकारतात.
3. रिन्युअल अँड डिक्लेरेशन : काही कंपन्या विनाशर्त तहहयात रिन्युअलची ऑफर देतात. क्लेमच्या वेळेस वादाची परिस्थिती उद्भवू नये म्हणून तुमच्या प्रकृतीशी निगडित प्रत्येक तथ्थ्यांची माहिती विमा कंपनीला जरूर द्यावी.

गरजेनुसार करा पॉलिसीची निवड
1. लिमिटलेस : या अंतर्गत आजार/उपचाराच्या भौगोलिक स्थितीनुसार कोणतीही मर्यादा नसते. कंपनी वास्तविक परिस्थितीच्या आधारावर दाव्याचे पेमेंट करते. 2. रिस्टोर बेनिफिट : या अंतर्गत जर पॉलिसीच्या अवधीत विम्याची संपूर्ण रक्कम वापरली गेल्यास कंपनी स्वस्त: विमा रक्कम रिस्टोर करून देते. ही रिस्टोर्ड सम अ‍ॅश्युअर्ड विम्याच्या उर्वरित कालावधीत कोणत्याही आजारासाठी वापरली जाऊ शकते. 3. आउटपेशंट डेंटल आणि ऑप्थेल्मिक ट्रीटमेंट : या अंतर्गत दात आणि नेत्रोपचार येतात. यात 24 तास रुग्णालयात राहण्याची गरज नसते. 4. डिलिव्हरी आणि नवजात अर्भक : या अंतर्गत नैसर्गिक/सिझेरियन प्रसूती, नवजात शिशूचे उपचार, त्याच्या लसीकरणावरील खर्च कव्हर होतात. या विम्याचे फायदे मिळवण्यासाठी बहुतांश कंपन्यांत वेटिंग पीरियड 24 वर्षे आहेत. 5. डायबेटिक केअर : ही पॉलिसी खासकरून मधुमेहाच्या रुग्णासाठी सुरू करण्यात आली आहे. यात फक्त डोळे, किडनी आणि पायाशी संबंधित आजार कव्हर केले जातात. इतर अवयवांच्या कव्हरेजसाठी स्वतंत्रपणे एक बेसिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली जाऊ शकते. 6. कार्डियाक केअर : सहा महिने ते 3 वर्षांदरम्यान ज्या हृदयरुग्णांची पहिली पीटीसीए (स्टेंटिंग) किंव सीएबीजी शस्त्रक्रिया झालेली आहे, अशांना या पॉलिसीमध्ये कव्हर मिळते. 7. सीनियर सिटीझन केअर : यात 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आजारावर होणारा खर्च कव्हर केला जातो. 8. ओपीडी बेनिफिट : यानुसार बहुतांशी ओपीडीत तुम्हाला येणारे खर्च कव्हर केले जाऊ शकतात.
वरीलपैकी 1 ते 4 क्रमांकाचे फायदे स्टँडर्ड हेल्थ पॉलिसीसोबत उपलब्ध असतात. यासाठी सामान्य हेल्थ पॉलिसीच्या तुलनेत अधिक प्रमाणात रक्कम खर्च करावी लागते.
(लेखक प्रमाणित वित्तीय नियोजक आणि द फायनान्शिअल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे सदस्य आहेत.)
rajnish.jain@dainikbhaskargroup.com