आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Insurance, Vehicles, AC, Fuel Price Hike In New Year

नव्या वर्षात विमा, वाहने, एसी, इंधन महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नव्या वर्षाच्या प्रारंभापासून अर्थातच एक जानेवारी 2014 पासून सर्वसामान्यांच्या खिशावरील बोजा आणि भार वाढणार आहे. खाद्यपदार्थांपासून ते विमा उत्पादने आणि कंझ्युमर ड्युरेबल्स यांसारख्या वस्तू महागणार आहेत. त्यामुळे मध्यमवर्ग आणि त्याखालच्या वर्गावर सर्वाधिक परिणाम होणार आहे.
वाहन कंपन्या एक जानेवारीपासून कारच्या किमती वाढवणार आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने ऑटो कंपन्यांनी किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महिंद्रा अँड महिंद्रा दोन टक्के किंमतवाढ करणार आहे, तर फोक्सव्ॉगन 2.5 टक्क्यांपर्यंत किमती वाढण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर ऑडीही 3 ते 5 टक्क्यांनी किमती वाढवणार आहे. इतर कंपन्याही किमतीत वाढ करण्याची शक्यता आहे.
गॅस, डिझेल महागणार
नव्या वर्षात गॅस आणि डिझेलच्या किमती वाढवण्याची सरकारची योजना आहे. गॅसच्या किमती आगामी काळात गतीने वाढण्याची शक्यता आहे. सामान्यांच्या स्वयंपाकगृहावर त्याचा परिणाम जाणवणार आहे.
एसी महागणार : कारनंतर टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूंमुळे (कंझ्युमर ड्युरेबल्स) सर्वसामान्यांच्या खिशाला सर्वाधिक फटका बसणार आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, बीईई रेटिंगची तारांकित पद्धत लागू झाल्याने हे सर्व घडते आहे. फ्रिज आणि एसीसाठी बीईईची नवी स्टार रेटिंग एक जानेवारीपासून लागू होणार आहे.