आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interest Rate Responsible For Inflation, Reserve Bank Sentiment

चढ्या व्याजदरासाठी महागाईच जबाबदार, रिझर्व्ह बँकेचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चढे व्याजदरच महागाई होण्यास कारणीभूत असल्याचे रिझर्व्ह बॅँकेने अखेर मान्य केले, पण व्याजदर कमी केले तरी अशा परिस्थितीत या घटलेल्या व्याजाचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणे बॅँकांना शक्य नसल्याचे मतही मध्यवर्ती बॅँकेने व्यक्त केले आहे.
रिझर्व्ह बॅँकेने व्याजदर घटवले या कमी झालेल्या व्याजदराच्या बळावर बॅँकांना ठेवीदारांकडून निधी गोळा करता येऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत बॅँकेना कमी खर्चात निधी उपलब्ध होऊ शकत नाही तोपर्यंत रिझर्व्ह बॅँकही इतक्या कमी व्याजदराला कर्ज पुरवठा करण्यास बॅँकांना जबरदस्ती करू शकत नाही असे मत रिझर्व्ह बॅँकेचे डेप्युटी गव्हर्नर के.सी. चक्रवर्ती यांनी ‘एमसीसी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज’च्या एका परिषदेत व्यक्त केले.
सध्याच्या महागाईचा कहर लक्षात घेता येत्या नाणेनिधी धोरण आढाव्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता कमी आहे. कारण रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनीही या चढ्या महागाईबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परंतु अगोदरच भांडवली खर्चाचा भार वाढल्याने मध्यवर्ती बॅँकेने व्याजदरात वाढ करू नये अशी अपेक्षा उद्योग जगत व्यक्त करत आहे. रघुराम राजन यांनी चार सप्टेंबरला गव्हर्नरपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून दोन वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली. त्यामुळे ज्या रिझर्व्ह बॅँकेकडून ज्या व्याजदराने बॅँकांना कर्ज पुरवठा केला जातो तो आता पावणेआठ टक्क्यांवर गेला आहे. महागाईला वेसण घालण्यासाठी 20 सप्टेंबर आणि 29 ऑक्टोबर अशा दोन वेळा पाव टक्क्यांनी व्याजदरात वाढ झाली आहे.