Home | Business | Industries | interst increases two times in a year, business

व्याजदर वाढीमुळे बॅँकांची बुडीत कर्जे वाढण्याची शक्यता

agency | Update - Jun 02, 2011, 11:39 AM IST

मागील महिन्यात ३ मे रोजी शिखर बॅँकेने व्याजदरात सर्वाधिक अर्धा टक्क्याने वाढ केली.

  • interst increases two times in a year, business

    rbi_258_01लहान कंपन्यांनी घेतलेले कर्ज आता व्याजदरांत झालेल्या वाढीमुळे फेडणे शक्य होत नसल्यामुळे नजीकच्या काळात बॅँकांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत सेंट्रल बॅँक ऑफ इंडियाचे मावळते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. श्रीधर यांनी व्यक्त केले.
    बुडीत कर्जाची समस्या हाताळण्यासाठी वेगवेगûया बॅँकांनी विविध प्रकारची धोरणे आखली आहेत. निधीचा वाढत्या खर्चाचा भार झेलणे या लहान कंपन्यांना शक्य नाही. त्यामुळे या लहान खात्यांवर जास्त ताण येण्याची शक्यता आहे. आधीच्या तुलनेत या कंपन्यांना आता सहज निधी उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे हा ताण जाणवण्याच्या शक्यतेकडे श्रीधर यांनी लक्ष वेधले.
    आर्थिक मंदीच्या वर्षांमध्ये देशाच्या विकासाला गती देण्यासाठी रिझव्र्ह बॅँकेने मृदू धोरण अवलंबले होते, पण त्यानंतर महागाईचे वाढते स्वरूप लक्षात घेऊन शिखर बॅँकेने कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली. चलनवाढीला आळा घालण्यासाठी रिझव्र्ह बॅँकेने गेल्या १२ महिन्यांमध्ये जवळपास आठ वेळा प्रमुख व्याजदरांमध्ये वाढ केली. चलनवाढीला आळा घालण्यासाठी गरज भासल्यास पुन्हा व्याजदरांत वाढ करण्याचे संकेतही रिझव्र्ह बॅँकेने त्यावेळी दिले.
    आपल्या बॅँक खातेदारांना समभाग, डेरिव्हेटिव्हज, फ्यूचर आणि ऑप्शन्स तसेच अन्य विविध साधनांमध्ये व्यवहार करणे सुलभ व्हावे, यासाठी एन्जेल ब्रोकिंगबरोबर करार करण्यात आल्याची घोषणा या वेळी करण्यात आली. रिझव्र्ह बॅंकेकडून बचत खात्यांवरील व्याजदर वाढविण्याचे निर्देश येण्याची शक्यता आहे. बचत खात्यावरील व्याजदर वाढल्यास बॅंकांकडून दिल्या जाणा:या सेवांवरील अधिभारातही वाढ होणार आहे.
Trending