आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मोबाइल उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंटेक्स टेक्नॉलॉजीजने आपल्या दोन स्मार्टफोनमध्ये ‘मातृभाषा’ हे नवीन अॅप्लिकेशन कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना आपल्या मातृभाषेत मोबाइलचा वापर करता येऊ शकणार आहे.
इंटेक्सने अॅक्वा मार्व्हल आणि अॅक्वा 3.2 या सध्याच्या दोन स्मार्टफोनवर हे अॅप्लिकेशन दिले आहे. छोट्या गावातील स्मार्टफोनधारकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने कंपनीने त्यांना परवडणार्या स्मार्टफोनवर हे अॅप्लिकेशन दिले आहे. इंटेक्सच्या अॅक्वा मार्व्हलची किंमत 3,990 रुपये असून अॅक्वा 3.2 हा 3,790 रुपयांना उपलब्ध आहे. सतरा भारतीय भाषांपैकी तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाषेत पडद्यावर मिळणारा व्हर्च्युअल कीबोर्ड हे या अॅप्लिकेशनचे खास वैशिष्ट्य आहे. ज्याद्वारे ग्राहक सहजपणे प्रादेशिक भाषेत मजकूर तयार करू शकतात आणि त्या त्या भाषेतील जोडाक्षरे व अक्षरभेद त्यात उपलब्ध आहेत.
‘मातृभाषा’ची ठळक वैशिष्ट्य
भाषेची निवड - एसएमएस पाठवणे, संपर्क नावे सेव्ह करणे आणि शोधणे, गुगल सर्च इ. साठी डिफॉल्ट भाषा म्हणून 17/21 भारतीय भाषांमधून एक भाषा निश्चित करा.
फोनबुक - निवडलेल्या भाषेत संपर्क नावे साठवून ठेवा किंवा शोधा
या स्मार्टफोनमध्ये हिंदी, उर्दू, तामिळ, बंगाली, आसामी, पंजाबी, गुजराती, संस्कृत, मैथिली, मराठी, बोडो, संथाली, मणिपुरी, सिंधी, डोगरी, कोकणी, नेपाळी, कन्नड, मल्याळी, उडिया आणि तेलगू या भाषांचा समावेश आहे.
भाषा बदलण्यासाठी काय कराल
० वापरकर्त्याला खालील अनुक्रमाने जावे लागेल
० पायरी 1: सेटिंग्ज > लँग्वेज आणि कीबोर्ड > येथे जा
० पायरी 2: एका स्पर्शासह दिसणार्या कीबोर्ड सूचीतून तुम्हाला हवी ती भाषा निवडा. समजा तुम्ही मराठी निवडता
० पायरी 3: कीबोर्डकडे जा आणि इनपुट मेथड > डिफॉल्ट > सिलेक्ट हिंदी इनपुट मेथड या अनुक्रमाने जाऊन ओके दाबा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.