आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intex Launch Firest Firefox Smartphone, Business Gadget News In Marathi

इंटेक्सचा फायरफाॅक्स प्रणालीवरील पहिला फाेन १९९९ रुपयांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- परवडणाऱ्या स्मार्टफाेन बाजारपेठेत पंख पसरण्यासाठी इंटेक्स या कंपनीने देशातील पहिला ‘फायरफाॅक्स’ अाॅपरेटिंग प्रणालीवर चालणारा ‘क्लाऊड एफएक्स’स्मार्टफाेन बाजारात अाणला. बाजारातील हा सर्वात स्वस्त फाेन असल्याचा दावा कंपनीने केला असून ताे ‘ स्नॅपडील’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात अाला अाहे. याची किंमत १,९९९ रुपये आहे.

फीचर्स...एक गिगार्हट्झ प्राेसेसर, १२८ एमबी रॅम, २५६ एमबी मेमरी, २ एमपी रिअर आणि व्हीजीए कॅमेरा, १२५० एमएएच बॅटरी, इंटरनेट व इतर अॅप वापरण्यास सहज साेपे. ही याची काही वैशिष्ट्ये आहेत. हा नवा स्मार्टफाेन ड्युएल सिमचा अाहे.