आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Investment: तरुणांसाठी आर्थिक नियोजनाच्या टिप्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैशाचे मूल्य जाणा
प्रत्येक तरुणाला पैशांची किंमत असावी. कोणत्या तरी उत्पादक कामासाठी आपण जो वेळ देतो त्या बदल्यात आपल्याला पैसे मिळतात याची जाणीव असावी. उदाहरणार्थ, समजा एखाद्याचे मासिक उत्पन्न 50 हजार रुपये असेल, तर 25 दिवस म्हणजेच 200 तासांत प्रतितास 250 रुपये कमाई आहे. खर्च करताना आपल्या उत्पन्नाइतके त्याचे मोल आहे का हे पडताळून पाहा. पैशांची किमत ओळखा आणि वित्तीय शिस्त अंगीकारा.
समजा मासिक उत्पन्न
50,000रुपये आहे
तर 25 दिवस म्हणजेच 200 तासांत प्रतितास 250 रुपये कमाई आहे.
उत्पन्नाच्या 20 टक्के बचत करा
मासिक उत्पन्नाच्या किमान 20 टक्के रक्कम बचत करायला शिका. वित्तीय शिस्त अंगी बाणवण्याचा हा एक चांगला उपाय आहे. यासाठी अल्प बचत योजना, म्युच्युअल फंडाचे एसआयपी. पीपीएफ आदी पैकी कोणतेही साधन निवडता येईल. गुंतवणुकीपूर्वी त्या साधनांचे फायदे-तोटे जाणून घ्या. गुंतवणुकीसाठी सोपा मार्ग स्वीकारा आणि त्यावर कायम राहा. आमिषाला बळी न पडता बचत खर्च करू नका.
आपत्कालीन निधी जमवा
महिन्याकाठी मिळणा-या उत्पन्नातून किमान 20 टक्के रकमेची बचत करून किमान तीन महिन्यांच्या उत्पन्नाइतकी रक्कम जमवा. ही रक्कम एका ठिकाणी सुरक्षित ठेवा. संकटकाळात त्याचा वापर करता येईल. नोकरी सोडणे, आरोग्यविषयक समस्यांच्या रूपात संकट येऊ शकते. त्या वेळी आर्थिक चणचण भासणार नाही यासाठी आपत्कालीन निधी (इमर्जन्सी फंड) उपयोगी ठरतो.
पुरेसे विमा संरक्षण घ्या
बचतीला पुरेशा विमा संरक्षणाचा आधारही हवाच. आर्थिकदृष्ट्या तुमच्यावर कोणी अवलंबून असेल तर आयुर्विमा घ्या. कंपनीकडून भले आरोग्य विमा संरक्षण मिळत असले तरी पर्र्यायी आरोग्य विमा आणि अ‍ॅक्सिडेंट विमा असावा. पर्यायी विमा किती असावा याचे मूल्यांकन करा,
मात्र, प्रारंभीच्या काळात आपल्या उत्पन्नाच्या 20 पटीइतके विमा संरक्षण असावे.
विमा पॉलिसींची खरेदी टाळा
कर बचत साधण्यासाठी गुंतवणूक करताना तरुण नेहमी चुका करतात. नवी नोकरी किंवा व्यवसाय करणारा प्रत्येक तरुण विमा पॉलिसी घेऊन कर वाचवतो येतो, असे समजून चालतो. विमा उतरवा, परंतु तो जोखमीपुरताच. कर बचत आपोआप साध्य होईल, केवळ कर वाचवायचा म्हणून विमा पॉलिसी खरेदी टाळा.
शक्यतो कर्ज घेणे टाळा
तुमच्या खात्यातील नियमित उत्पन्नाचे आकडे पाहून अनेक बँकांकडून कर्जाच्या ऑफर येतात. आर्थिक उद्देश स्पष्ट नसतो तेव्हा अनावश्यक कर्जाच्या जाळ्यात अडकू नका. जोपर्यंत उत्पन्न आणि खर्चाचे योग्य व्यवस्थापन साधता येत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्वरूपाच्या कर्जापासून चार हात दूर राहा.