आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्व्हेस्टमेंट: एका वर्षापुरत्या गुंतवणुकीसाठी पर्याय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकदा आपण लघु मुदतीच्या गुंतवणुकीसाठी अधिक जोखमीचे पर्याय निवडून बसतो. पर्यायांची योग्य माहिती नसल्यामुळे आपल्यावर ही वेळ येते. मात्र, थोडी चौकशी आणि माहिती घेतल्यास शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्येही बर्‍यापैकी नफा मिळवला जाऊ शकतो. उदाहरणार्थ..

1. सेव्हिंग अकाउंट : गुंतवणुकीचा हा पर्याय सर्वात आधी लक्षात येतो. बचत खात्यावरील व्याजदर आता नियंत्रणमुक्त झालेले आहेत. बचत खात्यांवरील वार्षिक 10 हजारांपर्यंतचे व्याज आता करमुक्त करण्यात आलेले आहे. दररोजच्या हिशेबाने बँका व्याजाची मोजणी करतात. गुंतवणूकदारांसाठी हे फायदेशीरच आहे. काही बँका 6 ते 7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. मात्र, ते अटी आणि शर्तींसह.

2. फिक्स्ड डिपॉझिट : इतर पर्यायांच्या तुलनेत मुदत ठेवींमध्ये (एफडी) लिक्विडिटीचे प्रमाण अधिक असते. मात्र, यावर मिळणारे व्याज हे करपात्र असते. अधिक कर कक्षेत येणार्‍यांसाठी ते निव्वळ परताव्यात कपातीचे काम करते. उदा. 9 टक्क्यांपर्यंतचा समग्र नफा मिळाल्यानंतर करांमुळे तो फक्त 6 ते 7 टक्क्यांपर्यंतच उरतो.

3. स्वीप सुविधा : बँका आपल्या बचत खात्यांवर स्वीप- इनस्वीप आऊट फॅसिलिटी म्हणजेच लिक्विड एफडीची सुविधा देतात. या अंतर्गत बचत खात्यात जमा असलेल्या रकमेच्या एका र्मयादेपर्यंतची रक्कम मुदत ठेवींमध्ये गुंतवली जाते. लिक्विड एफडीमधून आपला पैसा कधीही काढला जाऊ शकतो. लिक्विड एफडीमध्ये परतावाही अधिक मिळतो, मात्र तो करपात्र असतो.

4. अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड/डेब्ट फंड : अति लघु मुदत फंड एका वर्षापेक्षा कमी परिपक्वता असलेल्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. या उलट कमी मुदतीचे डेब्ट फंड एक ते दोन वर्षे परिपक्वतेच्या सिक्युरिटीमध्ये पैसे गुंतवतात. कमी कराची आकारणी हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. यात वैयक्तिक गुंतवणूकदारांवर 12.50 टक्के डिव्हिडंड डिस्ट्रिब्यूशन टॅक्स लागतो. त्याचा प्रभावी दर 13.25 टक्के इतका असतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा गुंतवणूकदारच्या कर कक्षेनुसार आकारण्यात येतो. दुसरीकडे, लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा आकारणी दर इंडक्सेशनसह 20 टक्के इतका असतो. अधिक कर आकारणी कक्षेत येणार्‍या गुंतवणूकदारांसाठी हे दोन्ही फायदेशीर पर्याय आहेत.

4. फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन : एफएमपी डेब्ट म्युच्युअल फंडाची योजना आहे. त्यातील परतावा हा म्युच्युअल फंडाच्या योजनांपेक्षा अधिक असतो. यात गुंतवणुकीनंतर व्याजदरांतील चढ-उतारांचा आपल्या परताव्यावर फरक पडत नाही. एफडीच्या तुलनेत या पर्यायावर कमी कर आकारणी होते. मात्र, यात लिक्विडिटीचे प्रमाण अधिक नसते.

उपरोक्त पर्याय किरकोळ गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे. मात्र त्यासोबत काही जोखमीही निगडित आहेत. लिक्विडिटी आणि टॅक्सेबिलिटीवर लक्ष ठेवत तुम्ही यातून तुमच्यासाठी योग्य पर्याय निवडू शकता.
(लेखक प्रमाणित वित्तीय नियोजक आणि द फायनान्शिअल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे सदस्य आहेत.)
(Rjp.solanki@dainikbhaskargroup.com)