आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, सोन्यामध्ये गुंतवणूक करणे का ठरते फायद्याचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. यामध्ये एक म्हणजे, यामुळे महागाईच्या प्रभावातून वाचता येते. अनेक वर्षांनंतरही सोन्यातून मिळणारी रक्कम ही महागाईला मागे टाकणारी ठरते. दुसरे कारण म्हणजे, सोन्यामधील चढ उतार हे शेअर मार्केटच्या परस्पर उलटे असतात.
म्हणजे शेअरमार्केटमध्ये जर घट पहायला मिळाली, तर सोन्याच्या बाजारासाठी हे चांगले संकेत मानले जातात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये 5 ते 10 टक्क्यांचा भाग हा सोन्यासाठी राखून ठेवावा.
त्याचबरोबर कोणत्याही राजकीय आणि आर्थिक संकटाच्या परिस्थितीत सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून येते. सोने हे लिक्विडीटीचा विचार करता एक सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही कोणत्याही वेळेला सोने विकून पैसे मिळवू शकता.

त्याशिवाय सोन्याचे अलंकार गहाण ठेवूनही कर्ज मिळवता येऊ शकते. याला बँकेत अथवा सोनाराकडे गहाण ठेवता येऊ शकते.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या...
सोन्याची नाणी अथवा अलंकारामध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे-तोटे