आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investment In Maharashtra, Divya Marathi, Business

सार्वजनिक गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र देशात ‘टॉप’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकूण निव्वळ गुंतवणुकीच्या २० टक्के गुंतवणूक रक्कम आकर्षित करून महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य असल्याचा निष्कर्ष असोचेमने प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील कंपन्यांनी २००८- ०९ आणि २०१२-१३ या कालावधीत सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने सर्वािधक गंुतवणूक आकर्षित केली आहे. ही नवि्वळ गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत २० टक्के असल्याचे असाेचेमने म्हटले आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक रकमेची गुंतवणूक आकर्षित केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण ठरले असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

गुंतवणूक िस्थती
महाराष्ट्र : २० %, आंध्र प्रदेश : ८.४ %, तामिळनाडू ८.१ %, ओडशिा ६.७ %, उत्तर प्रदेश ६.२ %, गुजरात २.८ %, कर्नाटक २.५ %, हरियाणा ०.०८ %.