Home »Business »Business Special» Investment Information

निर्णय घेण्याआधी निधीची रणनीती समजणे महत्त्वाचे

हेमंत रुस्तगी | Jan 07, 2013, 02:00 AM IST

  • निर्णय घेण्याआधी निधीची रणनीती समजणे महत्त्वाचे

जेनिरंतर लाभ प्रदान करतात आणि जे शुद्ध इक्विटी निधींपेक्षा कमी जोखमीचे आहेत अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करू पाहणा-या गुंतवणूकदारांसाठी हा कठीण काळ आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध पर्याय मर्यादित झाले आहेत. जसे- फ्लेक्सी ऋण किंवा गतिशील बाँड राशी, जी सक्रियपणे त्यांच्या विभागांचे प्रबंधन करते. या ठिकाणी हा निर्णय घेण्याआधी निधीची रणनीती समजणे महत्त्वाचे आहे. तथापि प्रतिलाभ अधिक करण्यासाठी इक्विटीजचे छोटेसे प्रदर्शन करणे वाईट नसते, असे मानणा-या गुंतवणूकदारांसाठी मासिक आय योजना (एमआयपी) हा उत्तम पर्याय होऊ शकेल. कारण त्यांच्या संविभागात इक्विटी पर्याय शुद्ध ऋण राशीवर तीक्ष्ण बाजू प्रदान करण्याची शक्यता आहे.

मासिक आय योजनेचे (एमआयपी) नियमित उत्पन्न सृजनतेबरोबरच पुंजीतील वृद्धी उपलब्ध करणे, असा दुहेरी उद्देश आहे. हे दुहेरी उद्देश प्राप्त करण्यासाठी जोडलेली रक्कम सर्वसाधारणपणे ऋण, मुद्रा बाजार, इक्विटी आणि इक्विटी- उन्मुख उपकरणे यासारख्या वित्तीय साधनांत गुंतवली जाते. दुस-या शब्दांत, मासिक आय योजना (एमआयपी) मूळ रूपात अत्यंत परिमित संतुलित निधी आहे; ज्यामध्ये ऋण पोर्टफोलिओ स्थिर प्रतिलाभ प्रदान करतो आणि इक्विटी पोर्टफोलिओ समग्र लाभात सुधारणेची संभाव्यता निर्माण करतो. विशिष्ट बाजारकारकांमुळे प्रतिलाभाच्या मामल्यात कमी कालावधीत उतार-चढ होण्याची शक्यता आहे.

एमआयपी बाबतीत सर्वसाधारण धारणा ही आहे की, नियमित उत्पन्नाची आवश्यकता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी या योजना उत्तमरीत्या उपयुक्त आहेत. नि:संदेहपणे या योजनांचे मुख्य उद्दिष्ट गुंतवणूकदारांच्या नियमित उत्पन्नाची गरज पूर्ण करणे हे आहे. त्याच वेळी मासिक आय योजनांचे (एमआयपीज) एकाधिक समाधान (उपाय) हे प्रमुख लक्षण आहे. उदाहरणार्थ, ज्या गुंतवणूकदाराला ठरावीक काळात त्याची पुंजी तयार करण्याची इच्छा असेल, त्याला मासिक आय योजनांतर्गत (एमआयपी) वृद्धी पर्याय सर्वात आदर्श वाहन उपलब्ध करतो. तथापि, इक्विटीला उघड करण्याच्या क्रियेत योग्य निधीची निवड हे मुख्य आहे. एमआयपीजची विविध पर्यायी रूपे आहेत. उदाहरणार्थ, इक्विटी प्रकटीकरणाला अधिकतर 25-30% प्रतिशतता असणा-या एमआयपीज. जेव्हा या आक्रमक एमआयपीज समयाच्या दीर्घ अवधीत अधिक लाभ प्रदान करण्याची शक्यता आहे, इक्विटी प्रकटीकरणाचा स्तर त्यांना अधिक जोखमीचे बनवतो.

एक संतुलित गुंतवणूकदार 10-15% प्रतिशत इतक्या इक्विटी प्रकटीकरणाला शिरपेच चढवणा-या एमआयपीमध्ये गुंतवणूक करण्यास आरंभ करण्यास सर्व काही योग्य ते करेल. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, की इक्विटीतील गुंतवणूक कितीही छोटी असली तरी दीर्घकालीन वचनबद्धतेची आवश्यकता असते आणि म्हणून अल्पावधीतील कोणतीही अस्थिरता चिंतेचा विषय होता कामा नये. हे परिदृश्य भावी काळात आपण पाहू शकण्याची शक्यता आहे. म्हणून या निधीत पैसे गुंतवताना प्रत्येकाने स्वत:ची जोखीम घेण्याची पात्रता आणि वाढीव प्रतिलाभ मिळवण्याची गरज विचारात घ्यावी. जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओत छोट्या मार्गाने इक्विटीज समाविष्ट करू पाहणारे गुंतवणूकदार असाल आणि वेळोवेळी अस्थिरता कालखंड हाताळण्याच्या जोखमेची भूक असेल तर एमआयपीज हा आदर्श पर्याय असेल. याशिवाय एमआयपीज तुम्हाला इक्विटी बाजाराच्या लहरीपणाला, जो गुंतवणूकदाराच्या धैर्य आणि दृढतेसाठी अंतिम आव्हान रूपात येतो, तोंड देण्यास तयार करू शकते.

हेमंत रुस्तगी
लेखक वाइझ इन्व्हेस्ट अ‍ॅडवायझर्सचे सीईओ

hrustagi@yahoo.com

Next Article

Recommended