आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात गुंतवणुकीचा पाऊस, 26 प्रकल्पातून 3000 कोटींची गुंतवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विदर्भासारख्या मागास भागाचा विकास व्हावा, या हेतूने महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारीमध्ये अ‍ॅडव्हांटेज विदर्भ परिषद घेतली होती. या परिषदेचा हेतू साध्य होताना दिसतो आहे. काही बड्या कंपन्या येथे गुंतवणूक करण्यासाठी पुढे आल्या आहेत. एकूण 26 प्रकल्पांतून 3000 कोटींची गुंतवणूक विदर्भात होणार असल्याचे वस्त्रोद्योगमंत्री मोहंमद अरिफ नसीम खान यांनी सांगितले. यातून 3500 जणांना नोक-यांची संधी मिळणार आहे. भेल, रेमंड या कंपन्यांनी विदर्भातील प्रकल्पासाठी तयारीही सुरू केली आहे.


सार्वजनिक क्षेत्रातील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (भेल) गोंदिया जिल्ह्यातील साकोली येथे उपकरण निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली आहे. आता रेमंड ही वस्त्रोद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपनी यवतमाळ जिल्ह्यात प्रकल्प उभा करणार आहे. त्यासाठी कंपनीला 26 एकर जागा देण्यात आली आहे. रेमंडचा यवतमाळ जिल्ह्यात एक प्रकल्प कार्यान्वित आहेच, नव्या प्रकल्पामुळे 300 ते 400 कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे नसीम खान यांनी स्पष्ट केले.


अनुदानाचा फायदा : विदर्भात वस्त्रोद्योग क्षेत्रातील 26 प्रकल्प येण्याची शक्यता आहे. त्यातून या भागात 3000 कोटींची गुंतवणूक होईल, असा अंदाज खान यांनी वर्तवला. या प्रकल्पामुळे रोजगाराच्या 3500 नव्या संधी निर्माण होतील. विदर्भात गुंतवणूक करणा-या गुंतवणूकदारांना 10 टक्के अनुदान देण्याचे राज्य सरकारने याआधीच जाहीर केले आहे. केवळ यवतमाळच नव्हे, तर अमरावती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार असल्याचे खान यांनी सांगितले