आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक मंत्रा: आयटी शेअर्स देतील चांगला परतावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिमाही आर्थिक निकालानंतर आता माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राची नजर रुपयाच्या चालीवर आहे. एमएसएफएल रिसर्चचे विश्लेषक अंकिता सोमाणी यांच्या मते या क्षेत्राला दुस-या तिमाहीत चांगल्या वाढीची अपेक्षा आहे. रुपयाच्या मूल्यातील एक टक्का बदलाने आयटी कंपन्यांच्या नफ्यावर एक टक्का बदल होतो. टेक महिंद्रा आणि विप्रोच्या समभागांवर बाजाराची नजर राहील. आरईआयटीला सेबीने मंजुरी दिल्यानंतर बाजाराचा मूड बदलला आहे.

सिमेंट क्षेत्र
० मागणी वाढीच्या आशेने शेअर्समध्ये तेजीची अपेक्षा
० जेएम फायनान्शियलच्या मते, एप्रिल-जून मध्ये सिमेंटच्या आकडेवारीत चागली वाढ दिसून येईल.
० पावसाळा संपताच सिमेंटच्या मागणीत आणखी वाढीची अपेक्षा
० एप्रिल-जून तिमाहीत अल्ट्राटेक आणि जे लक्ष्मी सिमेंटच्या व्हॉल्यूममध्ये 15 टक्के वाढ झाली आहे.
० ब्रोकर्सच्या मते मिड-कॅप सिमेंट कंपन्या गुंतवणुकीसाठी जास्त आकर्षक आहेत.
तेल-वायू क्षेत्र
० कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा फायदा होणार.
० आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमती घसरल्याने ओएमसी कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहतील.
० एडलवाइस सेक्युरिटीच्या मते, डिझेलच्या किमतीवरील ओएमसीचा तोटा अद्याप घटलेला नाही.
० ओएमसी (तेल विपणन कंपन्या) समभागातील घसरणीनंतर गुंतवणुकीचा ब्रोकर्सचा सल्ला
० गॅस किमती अंतिम निर्णय झाल्यास ओएनजीसीला सर्वाधिक फायदा : जेएम फायनान्शियल
बँकिंग क्षेत्र
० बँकेच्या समभागांत तेजीची शक्यता
० मिडकॅप बँका गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहेत.
० तज्ज्ञांच्या मते बँक निफ्टीला 15,400 चा अडथळा राहील.
० विश्लेषकांच्या मते, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक समभागात गुंतवणूक योग्य राहील.
० सार्वजनिक बँकांवर नजर ठेवा
ऑटो क्षेत्र
० आठवडाभर तेजी टिकून राहू शकते.
० कंपन्यांच्या चांगल्या निकालानंतर सुरू झालेली तेजी पुढील आठवड्यात कायम राहू शकते.
० क्षेत्रातील मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्ससारख्या दिग्गज कंपन्यांच्या समभागांवर राहील नजर.
० वाहन समभाग निर्मात्या कंपन्याच्या समभागांची खरेदी करता येईल
फार्मा क्षेत्र
० कळीचा मुद्दा नसल्याने क्षेत्र मर्यादित कक्षेत राहणार.
० औषध कंपन्यांचे समभाग मर्यादित कक्षेत राहतील.
० एप्रिल-जून तिमाहीत सिप्लाचा नफा 39 टक्के घटला.
० एप्रिल-जून तिमाहीत सिप्लाचे उत्पन्न 13.5 टक्क्यांनी वाढले.
० जेफेरीसने सन फार्माची रेटिंग वाढवली असून त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे.
भांडवली वस्तू क्षेत्र
० चांगल्या व्हॉल्यूमसह खरेदी वाढण्याची शक्यता आहे.
० क्षेत्रातील कंपन्यांत चांगले व्हॉल्यूम आहेत.
० एल अँड टी, व्होल्टास आणि भेलमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता
० एजेंल ब्रोकिंगच्या मते, एल अँड टी खरेदी करा, लक्ष्य 1505 रुपये.
० व्होल्टास खरेदी करा, लक्ष्य 230 रुपये.