शेअर बाजारात आज (मंगळवार) आलेल्या तेजीला विशेषज्ज्ञांनी 'प्री बजट रॅली'च्या रुपात पाहात आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या सात जुलैपासून सुरु होणार आहे. आठ जुलैला रेल्वे तर 11 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात होणार्या घोषणा बाजाराची पुढील दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बाजाराचे विशेषज्ज्ञ गुंतवणूकदारांना पोर्टफोलियोमधील कॅपिटल गुड्स, पॉवर, डिफेन्स, एफएमसीजी तसेच रेल्वे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.
विशेषज्ज्ञांच्या मते, वरील क्षेत्रासंबंधित कंपन्यांबाबत सकारात्मक घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे गुंतवणूकदार एलअॅण्डटी, थर्मेक्स, एस्ट्रामायक्रो, बीईएमएल, रिलायन्स इंफ्रा, कालिंदी रेल, टीटागण वॅगन, बीएचईएल, आयटीसी आणि एचयूएलमध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, विशेषज्ज्ञांचे मत...