आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investors Droup Out In Mutual Funds, 24 Lakh Account Shut Down

म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांची गळती कायम, 24 लाख खाती बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये म्युच्युअल फंड उद्योगाला जवळपास 24 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांवर पाणी सोडावे लागले आहे. नफारूपी विक्री आणि विविध विलीनीकरण योजनांमुळे वैयक्तिक खाती किंवा खातेसंग्रहाच्या स्वरूपात हे गुंतवणूकदार गमवावे लागले आहेत.
भांडवल बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण 45 म्युच्युअल फंड कंपन्यांकडे एकूण 4.04 कोटी गुंतवणूकदारांची नोंद झाली आहे. अगोदरच्या आर्थिक वर्षातल्या याच कालावधीतील 4.28 कोटी गुंतवणूकदारांच्या तुलनेत त्यात एकूण 24.23 लाख गुंतवणूकदारांची संख्या घटली आहे. एका म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराकडे अनेक प्रकारचे रोखे संग्रह असू शकतात आणि या रोखेसंग्रहाचे आकडे वैयक्तिक गुंतवणूकदाराच्या खात्याला दिलेला असतात. म्युच्युअल फंड उद्योगातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अन्य काही कारणांबरोबरच नफारूपी कमाई आणि विलीनीकरण योजनांमुळे रोखेसंग्रहाचे प्रमाण घटले आहे.एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत म्युच्युअल फंडांच्या समभाग योजनांमधील गुंतवणूकदारांची संख्या 29 लाखांनी घटली आहे.
दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करण्याबाबत गुंतवणूकदारांना गुंतवणुकी साक्षर करण्यासाठी म्युच्युअल फंडांकडून प्रयत्न होत असतानाही गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने घटत आहे. या गुंतवणूकदारांच्या घटत्या संख्येबद्दल सेबीचे अध्यक्ष यू.के. सिन्हा यांनीदेखील गेल्या वर्षी चिंता व्यक्त केली होती.
या कालावधीत सेन्सेक्सने 1956 अंकांची वाढ नोंदवूनदेखील चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये समभाग योजनांमधील गुंतवणूकदारांची संख्या कमी झाली आहे.
बॅलन्स फंडांवर उड्या : कर्ज निधी योजनांमधील गुंतवणूकदारांची संख्या नोव्हेंबरअखेर वाढून ती 66.22 लाखांवरून 4.84 लाखांवर गेली आहे. एक्स्चेंज ट्रेडेड फंडातील गुंतवणूकदारांची संख्यादेखील कमी होऊन ती 6.86 लाखांवरून 53 हजारांवर आली आहे. समभाग आणि कर्ज अशा दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक केल्या जाणा-या बॅलन्स योजनांमधील गुंतवणूकदारंची संख्या 79,662 नी वाढून 27 लाखांवर गेली आहे.
म्युच्युअल फंड कंपन्यांनी 30 नोव्हेंबरअखेर 1,359 योजना गुंतवणूकदारांसाठी आणल्या त्यात 351 समभाग योजना तर 916 कर्जाशी निगडित योजना होत्या. गेल्या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड उद्योगाने 36 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदार गमावले आहेत. त्या अगोदरच्या वर्षात ही संख्या 15 लाख होती.