आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investors Get More Benefit In Share Market, Divya Marathi

तेजीची किमया, गुंतवणूकदार मालामाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भांडवल बाजारात आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यंदाच्या वर्षामध्ये आतापर्यंत या गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत तब्बल २३.३३ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
३१ डिसेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत सेन्सेक्समध्ये जवळपास २५.४९ टक्क्यांनी वाढ झाली. आठ सप्टेंबरला तर सेन्सेक्सने २७,३१९.८५ अंकांची ऐतिहासिक विक्रमी पातळी गाठली. त्यामुळे भांडवल बाजारात नोंदणी असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजारमूल्यही ९४ लाख कोटी रुपयांच्या जवळपास गेले आहे; पण त्या उलट गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीमध्ये एक लाख कोटी रुपयांची भर पडून ती गेल्या वर्षात ७०,४४,४३१ कोटी रुपयांवर गेली आहे.

मुंबई शेअर बाजारातील सर्व नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारभांडवल सध्या ९३,७७,६७२ कोटी रुपये असून १०० लाख कोटींचा मैलाचा दगड ओलांडण्यासाठी फक्त ६.२२ लाख रुपयांची कमतरता आहे.
केंद्रात नवीन स्थिर सरकार आल्यापासून गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विदेशी निधीचा भक्कम ओघही येत असल्याने देशातील शेअर बाजाराला मोठी चालना मिळत असल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

बाजारात सध्या घसरणीचा घसरणीचा थोडाफार कल असला तरी येणा-या काही दिवसांत खरेदीला पुन्हा सुरुवात होईल. त्यामुळे बाजारातील सध्याचा कल तेजीचाच असल्याचे मतही अन्य काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

निवडणूक काळातील सेन्सेक्सचा परतावा
११.४%
२०१४
३७.०%
२००९
९.०%
२००४
मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील सूचकांक सेन्सेक्सने मागील तीन लोकसभा निवडणूक काळात (१५ मे ते ३० सप्टेंबर) दिलेला परतावा.
* मुंबई शेअर बाजारातील एकूण नोंदणीकृत कंपन्या : ५,४८५
* एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेल्या कंपन्या : टीसीएस, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज लि., आयटीसी, इन्फोसिस, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, सन फार्मा,
* विदेशी गुंतवणूकदारांनी वर्षाच्या सुरुवातीपासून केलेली गुंतवणूक : समभाग बाजारपेठ : ८३,४३८ कोटी रु. कर्ज बाजारपेठ : १.१८ लाख कोटी रु.

स्मॉल कॅप, मिड कॅपचा धडाका
यंदाचे वर्ष स्मॉल व मिड कॅप कंपन्यांसाठी फलदायी ठरले आहे. मागील तीन वर्षे परताव्याच्या आघाडीवर मार खाणा-या या क्षेत्राने यंदा गुंतवणूकदारांच्या पदरात परताव्याचे भरभरून माप टाकले आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांनाही यंदा या क्षेत्राने उत्तम रिटर्न दिले आहेत. यंदा बीएसई मिड कॅप निर्देशांकाने २४.७४ टक्के, तर स्मॉल कॅप निर्देशांकाने ३७.१० टक्के रिटर्न दिले आहेत. २००४ मध्ये या निर्देशांकांनी अनुक्रमे १७.५ आणि २८.५ टक्के परतावा दिला होता.

आयपीओनीही दिला चांगला रिटर्न
यंदाच्या वर्षात आतापर्यंत चार कंपन्यांनी भांडवल बाजारात प्रवेश केला आहे. या चार आयपीओंच्या बाजारातील नोंदणीमुळे गुंतवणूकदारांना चांगली कमाई करता आलीवंडरेला हॉलिडेजच्या प्राथमिक समभाग विक्रीला लक्षणीय प्रतिसाद मिळाला. या समभाग विक्रीच्या प्रती समभाग १२५ रुपये या इश्यू किमतीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. मे महिन्यात बाजारात आल्यानंतर या कंपनीच्या समभाग किमतीत २८ टक्क्यांनी वाढ झाली. स्नाेमन लाॅिजस्टिक या कंपनीच्या प्रती समभाग ४७ रुपये इश्यू किमतीत ८४.१४ टक्क्यांनी वाढ झाली. शारदा क्राेपकेम सप्टेंबरमध्ये भांडवल बाजारात आयपीआे घेऊन आली त्यावेळी असलेल्या १५६ रु. इश्यू किमतीमध्ये ३३.७८ टक्क्यांनी वाढ झाली.