(Tinhte.tv वर आयपॅडचे लिक झालेले फोटो)
गॅजेट डेस्क - व्हिएतनामची वेबसाईट Tinhte.tv ने अॅप्पलच्या नेक्स्ट जनरेशन आयपॅडने एअर 2 चे फोटो लॉन्चींगच्या आधीच लिक झाले आहेत. फोटोंना पाहून तर हा नवा आयपॅड जुन्याच आयपॅडप्रमाणे दिसेल, मात्र या नव्या आयपॅडची जाडी कमी करण्यात आली आहे.
कसे असू शकतात फीचर्स -
* बातम्यांमधून समोर आलेल्या माहितीनुसार या आयपॅडमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर असू शकते.
* यावेळी टॅबलेटमध्ये फ्रंट कॅमेर्यासोबत लाईट सेंसर देण्यात आला आहे.
* हा नवा आयपॅड 7mm एवढा स्लीम असेल, तसेच हा आयफोन 6 प्लस फॅबलेट 7.1mm पेक्षाही स्लीम असेल.
* Apple.club.tw ने लिक केलेल्या स्पेसिफिकेशननुसार या टॅबलेटमध्ये 2 GB रॅम आणि A8X प्रोसेसर चीप लावण्यात आली आहे.
अॅप्पल यंदा दोन नवे टॅबलेट लॉन्च करणार आहे. यासोबतच या लाँचिंग इव्हेंटमध्ये मॅक ओएस X सुध्दा लॉन्च केल्या जाऊ शकतो.
पुढील स्लाईडवर पाहा, आयपॅडचे लिक झालेले फोटो...