आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपल बदलून देणार आयफोनच्या खराब बॅटर्‍या; जाणून घ्या काय आहे उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया (अमेरिका) - जगप्रसिध्द स्मार्टफोन कंपनी अॅपल आपल्या आयफोन-5 च्या सर्व खराब बॅटर्‍या बदलून देण्यासाठी एक नवा उपक्रम हाती घेत आहे. हा उपक्रम भारतात 29 ऑगस्ट 2014 पासून सुरू होणार आहे, तर युनायटेड स्टेट्स आणि चीनमध्ये हा उपक्रम 22 ऑगस्टला सुरू होणार आहे. ह्या उपक्रमांतर्गत काही निवडक आयफोनच्या बॅटरी बदलून देण्यात येणार आहेत. यामध्ये ज्या आयफोनची बॅटरी लवकर डाऊन होते त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. अॅपलने दिलेल्या माहितीनुसार आयफोन-5 च्या काही फोन्समध्येच अशा प्रकारची खराबी आहे.
तुम्हाला जर तुमच्या आयफोनबद्दल शंका असले, अथवा हा उपक्रम तुमच्यासाठी आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर यासाठी तुम्हाला अपलच्या वेबसाईटवरील Apple support page वर जावे लागेल. येथे तुमच्या मोबाईलचा सिरियल नंबर टाकून तुम्ही तुमच्या मोबाईलबद्दल माहिती मिळवू शकता.
अशा प्रकारे शोधा तुमचा आयफोन - 5 चा सिरियल नंबर
आयफोन - 5 च्या सेटींग मेनु मध्ये जाऊन जनरल ऑप्शन शोधा. यामध्ये तुम्हाला तुमचा सिरियल नंबर मिळेल. (Setting Menu-General-Serial number)
पुढील स्लाईडमध्ये वाचा... आयफोनकडून बॅटरी बदलून घेण्याआगोदर हे आवश्य करा...
वरील सर्व फोटो केवळ बातमीच्या सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहे.