आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 सप्टेंबरला लॉन्च होऊ शकतो 'आयफोन 6'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - अ‍ॅपलचा बहूचर्चीत आणि बहूप्रतिक्षित आयफोन 6 बद्दल अनेक अफवा परसत आहेत. यावेळी फ्रेंच ब्लॉग Nowhere Else ने आयफोन 6 च्या बॉक्सचा फोटो प्रकाशित केला आहे. या फोटोत दाखवण्यात आलेल्या आयफोनमध्ये 9 सप्टेंबर अशी तारीख दिसत आहे. यावरून आयफोन 9 सप्टेंबरला लॉन्च होणार का असा अंदाज लावण्यात येत आहे.
या फोटोमध्ये फोनची स्क्रीनही दाखवण्यात आली आहे. याशिवाय हा आयफोन जून्या आयफोन प्रमाणेच दिसत आहे. कंपनीकडून आयफोनच्या लॉन्चिंगबद्दल अजूनतरी काहीच सांगण्यात आलेले नाही. मात्र आयफोन 6 लवकरच लॉन्च होणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. या फोनमध्ये पूर्वीच्या आयफोनपेक्षा मोठी स्क्रीन असेल. याशिवाय या फोनमध्ये टच सेंसरही असणार आहे.