आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आयफोन 6\' चा फोटो इंटरनेटवर पुन्हा लीक, आता \'इंस्टाग्राम\'वर शेअर झालेत फोटो!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोस्ट अवेटेड नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन 'आयफोन 6' लॉन्च होण्यास आता थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, त्या आधीच 'आयफोन 6'चे फोटो 'इंस्टाग्राम' या सोशल साइटवर लीक झाले आहेत. 'आयफोन6'चे फोटो एकदा पुन्हा लीक झाल्याने गॅजेट जगात चांगलीच खळबळ उडाली आहे.

आयफोन वेंडर 'फील्ड अॅण्ड वोल्क'ने 'आयफोन6'चे फोटो 'इंस्टाग्राम'वर शेअर केले आहे. फ्रंट पॅनल आणि राउंडेड एजेससोबत आयफोन 6ची इमेज दिसत आहे. 'इंस्टाग्राम'वरील फोटो आणि यापूर्वी शेअर करण्यात फोटो अगदी 'सेम टू सेम' आहेत.
अॅपल कंपनी यंदा दोन आयफोन लॉन्च करणार आहे. याबाबत यापूर्वी एक वृत्तही प्रकाशित झाले होते. दोन पैकी एक फोन 4.7 इंची तर दुसरा 5.5 इंच स्क्रीन असलेला आहे. या फोनच्या माध्यमातून अॅपल कोणत्या नव्या तंत्रज्ञानाची जगाला ओळख करून देणार आहे, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, लीक झालेले आयफोन6 चे फोटो....
(फोटो: Feldvolk.com)