आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 सप्टेंबरला लॉन्च होणार iPhone 6, जाणून घ्या काय असू शकतात फीचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डमी फोटो)
गॅजेट डेस्क - या वर्षीचा बहूप्रतिक्षित स्मार्टफोन 'आयफोन 6' च्या लॉन्चची तारीख जवळ येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आयफोन 16 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन 19 सप्टेंबरला लॉन्च होणार अशी बातमी आली होती. मात्र एका अ‍ॅपल स्टोअरने दिलेल्या माहितीनुसार Redmond Pie या वेबसाईटने 'आयफोन 6' मंगळवारी 16 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. यानंतर 14 ऑक्टोबरपासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होईल.

मात्र अजून अ‍ॅपलकडून 'आयफोन 6' संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तरीही 'आयफोन 6' सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार हे नक्की. मग हे लॉन्च 16 होवो की 19 ला मात्र आयफोन सप्टेंबरमध्ये येणार आणि 14 ऑक्टोबरपासून तो ग्राहकांसाठीही उपलब्ध होणार आहे.

काही दिवसांपूर्वी Economic Daily News च्या एका अहवालानुसार अ‍ॅपलचा 4.7 इंचाचा हा 'आयफोन 6' ऑगस्टमध्ये लॉन्च होईल आणि 5.5 इंचाचे अथवा 5.6 इंचचे याचे दुसरे मॉडेल सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात येईल अशी बातमी आली होती. सप्लाय चेनमधील काही सदस्यांनी Reuters या वृत्तसंस्थेकडून घेतलेल्या माहितीनुसार 'आयफोन 6' चे 4.7 आणि 5.5 इंचाचे दोन व्हर्जन असणार आहेत.

Economic Daily News ने ही 'आयफोन 6' चे 80 मिलियन यूनिटची कंपनीकडून निर्मिती होत असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी DazeInfo च्या अहवालात या बद्दल उल्लेख करण्यात आला होता की, अ‍ॅपलच्या या नव्या प्रोडक्शनमध्ये 80-90 मिलियन यूनिट्स बनवण्यात येणार आहेत. अ‍ॅप्पलच्या या शो स्टॉपर फोनबद्दल अनेक अफवा इंटरनेटवर पसरल्या आहेत. Divyamarathi.com तुम्हाला या फोन आणि त्याच्यामध्ये कोणकोणते फीचर्स असू शकतात या बद्दल माहिती देणार आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या 'आयफोन 6' च्या फीचर्सबद्दल
नोट: यातील कोणत्याही फीचरचा आम्ही दावा करत नाही आहोत. अ‍ॅपल 'आयफोन 6' बद्दल अनेक सुत्रांनी वेगवेगळी मते मांडली आहे. या फोनचा कोणताही अधिकृत फोटोही अजून प्रकाशित झालेला नाही. याच्यामुळे केवळ सादरीकरणासाठई आम्ही या मॉडेलचा फोटो दिला आहे.